Mumbai Costal Road News : नरिमन पॉईंट ते वरळी सी लिंक सुसाट; दुसऱ्या महाकाय गर्डरच्या लॉंचिंगचा मुहूर्त ठरला

Gurder
GurderTendernama

Mumbai News मुंबई : मुंबई कोस्टल रोडवरुन वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) मंगळवारी पहाटे समुद्राच्या लाटांचा अंदाज घेत बसवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ही तुळई बसवल्यानंतर मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉईंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत होणार आहे. ही तुळई दोन हजार ४०० मेट्रिक टन वजनाची आहे. तसेच १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे.

Gurder
सरकारच्या नाकावर टिच्चून गावकऱ्यांनी करून दाखवले! येणार तब्बल 6 कोटींचा खर्च

कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी हा त्यातील अतिशय आव्हानात्मक टप्पा आहे. या मार्गातील पहिली दोन हजार मेट्रिक टन वजनाची महाकाय तुळई बसवण्याचे काम महापालिकेने आधीच यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आता दुसरी तुळई बसवण्याचे काम पूर्ण करून किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पूर्णपणे जोडला जाणार आहे.

ही तुळई बसवताना वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोजक्याच सुट्या भागांचे (प्री-फॅब्रिकेटेड) पुलाचे नियोजन व बांधकाम करण्यात आले आहे. ही बांधकाम प्रणाली अवलंबत समुद्र व पर्यावरण घटकांना कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. या पुलाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून व दमट वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सी-५ गुणवत्ता असलेले गंजविरोधक रंगकाम केले आहे.

Gurder
Pune News : विद्यार्थ्यांना दिलासा; MPSC ने दूर केला संभ्रम; 2025 पासूनच...

पहिल्या तुळईप्रमाणे दुसऱ्या तुळईचे छोटे छोटे सुटे भाग अंबाला (हरयाणा) येथे तयार करण्यात आले आहेत. तेथून ट्रेलरवरून हे सुटे भाग दाखल आले आहेत. ते एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणण्यात आली आहे. ही तुळई दोन हजार ४०० मेट्रिक टन वजनाची आहे. तसेच १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे.

पहिली तुळई वरळीकडून नरिमन पॉईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर बसवण्यात आली असून, ती दोन हजार मेट्रिक टन वजनाची आहे. तसेच १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद असून जॅकचा वापर करून स्थापन करण्यात आली आहे.

दुसरी तुळई बसवण्यासाठी साधारणपणे तीन ते चार तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, यासाठी मुंबई महापालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com