Mumbai : बीएमसीचे 'ते' 65 कोटींचे टेंडर रद्द करा

BMC Tender : समाजवादी पक्षाचे माजी गटनेते रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
BMC Tender Scam
BMC Tender ScamTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : भायखळा प्राणीसंग्रहालयातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रस्तावित मत्स्यालयाच्या टेंडर (Tender) प्रक्रियेत गंभीर अनियमितता असून, हे टेंडर तत्काळ रद्द करण्यात यावे. तसेच टेंडर, बोली, मंजुरी प्रक्रियेची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व मुंबई महानगरपालिकेतील समाजवादी पक्षाचे माजी गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

BMC Tender Scam
Pune : कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे अडथळे काही कमी होईना, आता...

मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे की, प्रस्तावित प्रकल्पातील अग्निसुरक्षा, सार्वजनिक धोके यांचा टेंडरमध्ये विचार करण्यात आलेला नाही. तसेच या टेंडरच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याने प्रकरण गंभीर बनले आहे.

टेंडरमध्ये एका बोलीदाराने भाग घेतला होता. यामुळे टेंडर प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल शंका आहेत. स्पर्धा रोखण्यासाठी टेंडरमध्ये फेरफार करण्यात आला असावा. शिवाय, बोली लावणारी कंपनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची कंपनी असल्याने हे प्रकरण चिंताजनक असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले.

BMC Tender Scam
Mumbai : गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला; विक्रमी वेळेत काम पूर्ण

प्रस्तावीत मत्स्यालय हे पेंग्विन एन्क्लोजरच्या समोर होणार आहे. येथे दररोज मोठी गर्दी होवू शकते. त्यामुळे हे ठिकाण आगीचे धोके, चेंगराचेंगरी किंवा सुरक्षिततेच्या समस्यांसाठी हॉटस्पॉट बनू शकते. याव्यतिरिक्त, मत्स्यालयासाठी राखीव ठेवलेला भाग मूळतः पेंग्विन एन्क्लोजरशी जोडलेल्या स्मृतिचिन्ह दुकानासाठी ठेवण्यात आला होता, असे स्पष्ट करत या प्रकल्पाची व्यवहार्यता आणि आवश्यकतेबद्दल शेख यांनी प्रश्न उपस्थित केला.

मत्स्यालयासाठी वाटप क्षेत्रफळ फक्त ५,००० चौरस फूट असून कमाल मर्यादेची उंची २० फुटांपेक्षा कमी आहे. जागेचा अभाव, अपघाताची शक्यता, नियोजनातील अतिरेकीपणा आणि प्रक्रियेतील अनियमितता लक्षात घेता, टेंडर रद्द करावे आणि या प्रकरणाच्या एसीबी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

BMC Tender Scam
Tender Scam : टेंडरचे बिल मंजूर करण्यासाठी घेतली 40 हजारांची लाच; सहायक आयुक्तच जाळ्यात

मुंबई महापालिकेकडून या प्रकल्पावर ६५ कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. ही रक्कम प्रकल्पाच्या प्रमाणात जास्त आहे. परिणामी हे मत्स्यालय जगातील महागड्या मत्स्यालयांपैकी एक असेल, असा इशारा आमदार शेख यांनी केला आहे.

तारापोरवाला मत्स्यालयाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुमजली मत्स्यालय विकसित करण्याची राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मत्स्यालय दक्षिण मुंबईत ५ किलोमीटरच्या परिघात दुसरे मत्स्यालय होणार आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेचा हा प्रकल्प अनावश्यक असल्याचा आरोपही आमदार शेख यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com