Mumbai: बेस्टला मिळेना पुरवठादार; अखेर घ्यावा लागला कटू निर्णय

BEST Bus
BEST BusTendernama

मुंबई (Mumbai) : 'बेस्ट'ने (Best) १५० वातानुकूलित डिझेल बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. जानेवारी २०२३ मध्ये हे टेंडर (Tender) प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रवासी संख्येवर मर्यादा येत असल्याने मिनी वातानुकूलित बसेसची टेंडर प्रक्रिया रद्द केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

BEST Bus
आश्चर्य! नाशिक जिल्ह्यात बनतोय अतिपावसामुळेही न खचणारा पहिला रस्ता

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने 'बेस्ट'च्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 'बेस्ट'कडे ३,२२८ बसेस असून, २०२६ पर्यंत १० हजार बसेसचा समावेश 'बेस्ट'च्या ताफ्यात होणार आहे. या १० हजार बसेस पर्यावरणपूरक असतील असे 'बेस्ट'कडून सांगण्यात आले होते.
'बेस्ट'च्या ताफ्यात सद्यस्थितीत ३,२२८ बसेस आहेत. यापैकी १,६४६ बसेस 'बेस्ट'च्या मालकीच्या असून १,५८२ बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. यामध्ये डिझेलवर धावणाऱ्या ५७० बसेस आहेत.

BEST Bus
UAE सरकारचा नाशिक विमानतळाबाबत महत्त्वाचा निर्णय; आता...

२०२२ मध्ये बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील सुमारे १,७०० बस या मिडी, मिनी होत्या. आता मिनी, मिडी बसची एकूण संख्या १ हजार ४३६ आहे. त्यामुळे यापैकी डिझेलवर चालणाऱ्या भाडेतत्त्वावरील मिनी एसी बस २८० आहेत. यानंतरही भाडेतत्त्वावरील आणखी १५० एसी डिझेलवरील बस दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता. त्यांची टेंडर प्रक्रिया जानेवारीच्या २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. तीन वेळा टेंडर काढूनही त्याला बस पुरवठादारांकडून प्रतिसादच मिळत नव्हता.

जादा दर, डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती इत्यादी घटक त्याला कारणीभूत ठरत होते. अखेर हे टेंडर रद्द करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. त्यामुळे नवीन मिनी बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

BEST Bus
पालकमंत्री भुसेंचे नाशिककरांना दहा हजार कोटींचे गिफ्ट, पाहा काय?

काही महिन्यांपूर्वी 'बेस्ट'च्या एका कंत्राटदाराने आपली बस सेवा थांबवली होती. त्याच्याकडील २७५ बसगाड्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे बसगाड्याअभावी बेस्टला मुंबई शहर व उपनगरातील अनेक बसमार्ग बंद करावे लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com