मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार सुसाट; रखडलेल्या कामांना लवकरच..

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आलेले शिंदे सरकार आता ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के देत आहे. ठाकरे सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर आता शिवसेनेचा विरोध असलेल्या प्रकल्पांना हवा दिली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार आता बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग देण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे. बुलेट ट्रेन संदर्भातील सर्व रखडलेल्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट धावणार आहे.

Bullet Train
आठवडाभरच पाऊस, काय ते रस्ते अन् खड्डे ठेकेदाराचं काम एकदम 'ओक्केच'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असणारा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. मात्र, आता भाजपने समर्थन दिलेले सरकार सत्तेवर आल्यामुळे हा प्रकल्प वेग पकडू लागला आहे. ठाकरे सरकारच्या काळात रखडलेला बुलेट ट्रेन प्रकल्प आता जोमाने सुरु होणार आहे. बुलेट ट्रेन संदर्भातील सर्व रखडलेल्या कामांना मंजुरी लवकरच अंतिम मंजुरी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळताच बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट धावणार आहे. बुलेट ट्रेनसंदर्भातील सर्व कामांना मंजुरी देण्याची फाईल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे.

Bullet Train
फडणवीसांनी पुन्हा आणले; मुंबई मेट्रोची जबाबदारी अश्विनी भिडेंकडे

या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सुमारे 150 हेक्टर क्षेत्राचे अधिग्रहण करणे गरजेचे आहे. अद्याप या कामाने वेग घेतलेला नाही. केंद्र सरकारच्या समन्वयाने शिंदे सरकारच्या कार्यकाळात या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी 352 किलोमीटर काम गुजरात राज्यात होणार असून दादरा आणि नगर-हवेली परिसरातील कामांनाही वेग आला आहे. 2019 साली उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाचा अंदाजित वेळ वाढवण्यात आला होता. सुरुवातीला हा प्रकल्प 2023 साली पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो 2026 करण्यात आला होता. तीन वर्ष या प्रकल्पाला उशीर होईल, असे गृहित धरण्यात आले होते. महाराष्ट्रातील कामांची वाट न पाहता गुजरातमध्ये ठरल्याप्रमाणे कामे सुरु करण्यात यावीत, असे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, आता भाजपच्या पाठिंब्याचे सरकार महाराष्ट्रात आल्यामुळे दोन्ही राज्यातील कामे समान वेगाने सुरु राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com