MSRTC : उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; राज्यातील प्रमुख 30 बस स्थानकांवर...

ST Mahamandal
ST MahamandalTendernama

मुंबई (Mumbai) : राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) उत्पनात वाढ व्हावी, यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख ३० बसस्थानकांवर व्यावसायिक गाळे बांधून ते 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' (BOT) या तत्त्वावर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. भविष्यात आणखीही काही बसस्थानके 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर देता येतील, अशीही माहिती महामंडळातील उच्चपदस्थांनी दिली.

ST Mahamandal
Nashik : 'रामसेतू'वर होणार धनुष्य पूल; तर तपोवनात लक्ष्मण झुला

'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर जी बसस्थानके देण्यात येणार आहेत, त्या बसस्थानकांची प्रथम सल्लागार समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे. यामध्ये बसस्थानकांवर गाळे बांधण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का, याची प्रामुख्याने पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर सल्लागार समिती महामंडळाला अहवाल सादर करणार आहे.

यामध्ये महामंडळ आणि ठेकेदार यांना किती टक्के आर्थिक लाभ होईल, याचाही अभ्यास केला जाणार आहे. प्रस्ताव संमत झालेल्या बसस्थानकांवर 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' तत्त्वावर देण्यासाठी किती मजली इमारत उभारावी, त्यामध्ये किती गाळे द्यावेत, भाड्याची रक्कम किती असावी, हा अभ्यास करून मगच बसस्थानकांवर इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.

या कामासाठी टेंडर काढले जाणार आहे. हे गाळे ३० वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहेत. भविष्यात आणखीही काही बसस्थानके 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर देता येतील, अशी माहिती महामंडळातील उच्चपदस्थ उच्चपदस्थांनी दिली.

ST Mahamandal
Nashik : ओझरच्या HAL मध्ये Airbus विमानांच्या देखभाल दुरस्तीतून मिळणार 500 जणांना रोजगार

महामंडळाची बसस्थानके तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी मोक्याच्या ठिकाणी आहेत. बसस्थानकांवर इमारत बांधून त्यातील गाळे 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वीच सादर करण्यात आला होता; मात्र यावर प्रत्यक्ष कारवाई होण्यास विलंब केला जात आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईला असतांना याबाबत जलदगतीने कार्यवाही होणे अपेक्षित होते. त्यामुळे इतक्या वर्षांत महामंडळाला मोठा आर्थिक लाभ झाला असता; परंतु महामंडळाकडून या कामाला विलंब झाला. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com