MMRDA Tender: एमएमआरडीएच्या टेंडरमध्ये कार्टेलायझेशन; कोणी केला आरोप?

अटल सेतूवरील फायबर ऑप्टिक केबल, बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर व विक्रोळी फूट ओव्हर ब्रिज टेंडरमध्ये मोठ्या अनियमितता : शिवसेना नेते ॲड अनिल परब यांचे आरोप
Atal Setu
Atal SetuTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (MMRDA) टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर संगनमत आणि कार्टेलायझेशन होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार ॲड अनिल परब यांनी केला असून, यामुळे एमएमआरडीएला मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Atal Setu
Nashik ZP: जलसंधारण विभागात बेफिकिरीचा कहर; टेंडरची मंजूर फाईल फाडून मर्जीतील ठेकेदारावर मेहेरबानी

आमदार परब यांनी महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र लिहून काही विशिष्ट टेंडरबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अटल सेतूवरील फायबर ऑप्टिक केबल टाकण्याची निविदा, बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर आणि विक्रोळी येथील फूट ओव्हर ब्रिज (FoB) या प्रकल्पांच्या टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे परब नमूद केले आहे.

विक्रोळी FoB टेंडरमध्ये संगनमत

सुमारे 90 कोटी रुपयांच्या विक्रोळी फूट ओव्हर ब्रिज (FoB) टेंडरबाबत आमदार परब यांनी गंभीर आरोप करत हे टेंडर बंद होऊन दोन महिने उलटून गेल्यानंतरही उघडण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला 8 ठेकेदार सहभागी असताना, दबाव टाकून 6 जणांना माघार घ्यायला लावण्यात लावले आहे. आता केवळ 2 ठेकेदार उरले असून हे टेंडर Ms Speco या कंपनीला देण्याचा घाट एमएमआरडीए घालत असल्याचे आमदार परब यांनी सांगितले. 

Atal Setu
Nashik: म्हाडालाही जडला जिओ टॅगिंगचा संसर्ग

त्यामुळे या पार्श्वभूमीवर हे टेंडर सर्वांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे उघडावी किंवा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच माघार घेणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांची सुरक्षा ठेव जप्त करावी, अशी मागणीही आमदार परब यांनी केली आहे. विक्रोळी फूट ओव्हर ब्रिजचे टेंडर Ms Speco या कंपनीला दिल्यास हा मुद्दा लोकायुक्त, केंद्रीय दक्षता आयोग (CVC), तसेच येत्या विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केला जाईल, असा इशारा आमदार परब यांनी दिला आहे.

अटल सेतू टेंडरला वारंवार मुदतवाढ

अटल सेतू फायबर ऑप्टिक केबल टेंडरला फेब्रुवारीपासून कोणतेही ठोस कारण न देता 8 ते 10 वेळा मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ही मुदतवाढ देण्यामागे एका विशिष्ट कंपनीला फायदा करून देण्याचा हेतू असल्याचा दावा आमदार यांनी व्यक्त केला.

Atal Setu
Mumbai: एमएसआरडीसी मुख्यालयाच्या पुनर्विकासाला फेब्रुवारीचा मुहूर्त

परब यांनी पुढे म्हटले की, एमएमआरडीए मध्ये आता एक नवी पद्धत सुरू झाली आहे की टेंडर काढल्यानंतर इतर सर्व ठेकेदारांना माघार घ्यायला भाग पाडले जाते आणि शेवटी एका विशिष्ट कंपनीला काम दिले जाते.

यावेळी आमदार परब यांनी एमएमआरडीएला जानेवारी 2026 पासून ज्या टेंडरला तीनपेक्षा अधिक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, अशा सर्व टेंडरची सविस्तर माहिती देण्याची मागणीही केली आहे. यात कामाचे नाव, अंदाजित खर्च, सहभागी व माघार घेतलेल्या टेंडरकारांची नावे आणि अंतिम कंत्राटदार यांचा तपशील द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com