MMRDAचे कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेसाठी ५८०० कोटींचे टेंडर

MMRDA
MMRDATendernama

मुंबई (Mumbai) : कल्याण-तळोजा मेट्रो-१२ या मार्गिकेवरील १७ मेट्रो स्थानकांसह डेपोंचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी एमएमआरडीएने टेंडर प्रसिद्ध केले आहे. २०.७५ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी ५,८६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. इच्छूक कंपन्यांना २ फेब्रुवारीपर्यंत टेंडर सादर करता येणार आहे. तर ७ फेब्रुवारी रोजी टेंडर उघडली जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या शहरांमधील नागरिकांना या मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

MMRDA
'टेंडरनामा'ने उघड केलेल्या MIDC भूखंड घोटाळ्यावर शिक्कामोर्तब?

या मेट्रोच्या मार्गिकेत गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे. निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील फलाट स्टेशन इमारत व फलाट उन्नत असेल, तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला फलाट राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजूरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो एकमेकास जोडल्या जाणार आहेत. यात भिवंडी-कल्याण ही मेट्रो कल्याण येथेच जोडली जाईल.

MMRDA
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

निळजेजवळ ती कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोला जोडली जाणार आहे. गायमुख ते मीरा रोड, कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गिकेसाठी सल्लागार म्हणून सिस्ट्रा एस.ए. आणि डी.बी. इंजिनीअरिंग आणि कन्सल्टिंग या कंपनीची नियुक्ती करण्यात आला आहे. त्यासाठी २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये खर्च केला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे. निळजेजवळ एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर होत असून शीळफाटा परिसरात लोढा, रुणवालसह खासगी टाउनशिप आकार घेत आहेत. याच भागात बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहत आहे. मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे असेल. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. डेपो म्हटले की, कारशेडही आली. यामुळे भविष्यात या भागात मेट्रोची वर्दळ वाढणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com