मुंबईच्या सौंदर्यात आणखी भर पडणार; तब्बल 17 हजार कोटींचा खर्च करून 'ही' वास्तू उभारणार

Sion Road Bridge
Sion Road BridgeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईच्या सौंदर्यात आणि वैभवात आणखी भर पडणार आहे. रिलायन्स जिओच्या वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरनंतर मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आणखी एक भव्य दिव्य कन्व्हेन्शन सेंटर आकारास येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरच्या डिझाईनला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. तब्बल १७ हजार कोटी रुपये खर्च करून याची उभारणी केली जाणार आहे.

Sion Road Bridge
Mumbai : कोस्टल रोडची प्रतीक्षा संपली; 70 टक्के वेळेची तर 34 टक्के इंधनाची बचत होणार

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीचा अदानी समूह आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर बांधणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रिलायन्स जिओच्या वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला अदानींचे कन्व्हेन्शन सेंटर टक्कर देणार आहे. मिंटच्या अहवालानुसार, अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची सविस्तर ब्ल्यू प्रिंट येत्या दोन महिन्यांत मंजूर होईल, असे अहवालात नमूद आहे. अदानी समूहाच्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 275 खोल्यांचे पंचतारांकित हॉटेलही बांधण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरचे हब विलेपार्लेच्या पश्चिम उपनगराजवळ बांधले जाणार आहे.

Sion Road Bridge
Mumbai : दक्षिण मुंबईतील रखडलेल्या 'त्या' 7 प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर

अदानी ग्रुपचे हे कन्व्हेन्शन सेंटर 1.5 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये बांधले जाईल ज्यात 15000 ते 20000 लोकांसाठी बसण्याची सोय असेल. त्या तुलनेत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर 1 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आले आहे. अदानी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 1.2 दशलक्ष स्क्वेअर फूट इनडोअर एरिया असेल, त्यातील 0.3 दशलक्ष स्क्वेअर फूट वाहन पार्किंग आणि इतर कारणांसाठी वापरला जाईल. अदानी समूहाचे रिअल इस्टेट प्रकल्प अदानी रियल्टीच्या मालकीचे आहेत परंतु या कन्व्हेन्शन सेंटरची मालकी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सकडेच राहील. कन्व्हेन्शन सेंटर कोणत्याही मोठ्या शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालतात. या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली जातात ज्याद्वारे व्यापार आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com