Mumbai : उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी नव्याने 12000 स्वच्छतागृहे; 628 कोटींची...

Toilet
ToiletTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महापालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Toilet
मुंबईतील विकास प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार लागले कामाला

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची मागणी आजवर दुर्लक्षित होती. ती सोडवण्यासाठी पालकमंत्री श्री. लोढा यांनी पुढाकार घेतला असून, येत्या काळात उपनगरातील वस्त्यांमध्ये ४०,००० शौचालये बांधण्यात येणार आहेत. यापैकी १२,००० शौचालये नव्याने बांधण्यात येतील, तर २८,००० शौचालयांची पुनर्बांधणी करून त्यांना नवे रूप देण्यात येणार आहे. पालकमंत्री श्री. लोढा यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या प्रकल्पासाठी पालकमंत्री निधीतून आणि मुंबई महापालिकेद्वारे ६३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Toilet
Mumbai : 'या' ब्रिटिशकालीन स्थानकाचा लवकरच कायापालट; मध्य रेल्वेचे 900 कोटींचे बजेट

लोढा म्हणाले की, "मुंबई उपनगरातील झोपडपट्टीवासीयांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन, आखण्यात आलेल्या शौचालय उभारण्याच्या योजनेचा आज शुभारंभ झाला याचा आनंद आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी अत्याधुनिक दर्जाची, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये उभारण्यात येतील. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण मुंबई उपनगरातील नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या कोणत्याही मागणीकडे किंवा समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ!" 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com