पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 3 वर्षांत 10 लाख घरे; मंत्री अतुल सावेंची माहिती

PM Awas Yojana
PM Awas YojanaTendernama

मुंबई (Mumbai) : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजना या योजनेतून अधिकाधिक नागरिकांना घरकुल मिळाली पाहिजेत. यासाठी या योजनेअंतर्गत करण्यात येणारी घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी दिले. 

PM Awas Yojana
Devendra Fadnavis : स्वयंपुनर्विकास धोरणामुळे मुंबईत 5 लाख कुटुंबांची स्वप्नपूर्ती

मंत्रालयात मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. सावे म्हणाले, राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. पात्र लाभार्थ्यांची केंद्र सरकारच्या आवास सॉफ्ट या संगणक प्रणालीमध्ये नोंदणी करावी. या सर्व योजनांमधील प्रलंबित व अपूर्ण असलेली घरबांधणी कामे तातडीने पूर्ण करावीत. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत.

PM Awas Yojana
Mumbai-Pune आणखी जवळ येणार; 'त्या' मार्गासाठी 3 हजार कोटींचे टेंडर

त्यामध्ये यावर्षी पात्र लाभार्थ्यांना तीन लाख घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळण्यासाठी व दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यवाही करावी. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.राजाराम दिघे, उपसचिव दिनेश चव्हाण उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com