MHADA : खूशखबर! मार्चमध्ये मुंबईतील 4 हजार घरांची सोडत

सर्वाधिक 2,683 घरे ही गोरेगावच्या टेकडी प्रकल्पातील
MHADA
MHADATendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांची म्हाडाच्या (MHADA) घरांच्या सोडतीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मुंबई मंडळाच्या सुमारे 4 हजार घरांची सोडत मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे. म्हाडात सध्या सोडतीची वेगवान तयारी सुरु आहे. त्यापैकी सर्वाधिक 2,683 घरे ही गोरेगावच्या टेकडी प्रकल्पातील असतील. याशिवाय कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणे आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश सोडतीत करण्यात येणार आहे.

MHADA
Hindenburg Effect: 'अदानी'च्या धारावी पुनर्विकास टेंडरवर प्रश्न!

गोरेगावमध्ये म्हाडा भूखंड-अ आणि भूखंड-ब वर दोन प्रकल्प उभारत आहे. लिंक रोडवरील मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या भूखंड-अ मधील प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटात (EWS) प्रत्येकी 23 मजल्यांच्या सात इमारतींचा समावेश आहे. यामध्ये 322 चौरस फुटांची 1239 घरे आहेत. तर, एसव्ही रोडजवळ असलेल्या भूखंड-ब वरील 4-4 इमारती अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाच्या (LIG) आहेत. यातील अनुक्रमे 708 आणि 736 घरे सोडतीत असणार आहेत.

MHADA
Mumbai Municipal Corporation : जलबोगद्यांसाठी 433 कोटी खर्च करणार

गोरेगावमध्ये अत्यल्प गटातील घरांच्या किमती 35 लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. तर, अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 45 लाखांपर्यंत जाऊ शकतात. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरे आता तयार होत आहेत. त्याची किंमत नंतर ठरवली जाईल. यावेळीही या सदनिकांचा सोडतीत समावेश होणार नाही. सोडतीनंतर म्हाडाच्या घरांसाठी आता जास्त वाट प्रतीक्षा करावी लागणार नाही. म्हाडा सोडतीत फक्त ओसी मिळालेल्या घरांचा समावेश करणार आहे. सोडत जिंकल्यानंतर, लोकांना पैसे भरताच त्यांच्या घराच्या चाव्या दिल्या जातील.

MHADA
Mumbai : ठेकेदाराचे 'कल्याण'; टेंडरपूर्वीच सुरु केलेले काम अंगलट

म्हाडाच्या नव्या प्रणालीनुसार सोडतीसाठी इच्छूक असलेल्यांना एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ते कोणत्याही मंडळाच्या सोडतीत सहभागी होऊ शकतील. नोंदणी करतानाच सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील. म्हाडाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेमुळे सोडतीनंतर कागदपत्रे तपासण्यात लागणारा वेळ वाचणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com