महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठी भाषा भवनासाठी 108 कोटींचे टेंडर

Marathi Bhasha Bhavan
Marathi Bhasha BhavanTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथील प्रस्तावित मराठी भाषा भवन चर्नी रोडला समुद्र किनारी उभे राहणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा या कामाचे १०८ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Marathi Bhasha Bhavan
Mumbai-Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेन मार्गावर दहाव्या नदी पुलाचे मिशन सक्सेस

प्रकल्पाची जागा चर्नी रोड येथील समुद्राभिमुख भूखंडावर असेल. हे स्थळ मरीन ड्राइव्हच्या समोर आहे आणि पश्चिमेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि पूर्वेला सावित्रीदेवी फुले महिला वसतीगृहाने वेढलेले आहे. जागेची लांबी अंदाजे 54 मीटर आणि रुंदी सरासरी 32 मीटर असेल. मराठी भाषा भवन हे तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल. त्याची लांबी 39 मीटर आणि रुंदी सुमारे 22 मीटर असेल. संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल. इथे नागरिकांना थेट प्रवेश करता येईल. मरीन ड्राईव्हपासून या मंचापर्यंत पायऱ्यांची मालिका जाईल. इमारतीचे दुसरे प्रवेशद्वार उत्तरेकडील मोकळ्या जागेतून दिलेले आहे जिथून जिना आणि लिफ्टमध्ये प्रवेश करणे शक्य आहे.

Marathi Bhasha Bhavan
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी! काय आहे कारण?

इमारतीमध्ये 200 आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, 145 क्षमतेचे अॅम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा आणि एक मजला प्रशासकीय आणि कार्यालयीन जागा असेल. चार मजल्यांच्या प्रदर्शन दर्शिकेला चार विभागांमध्ये वर्गीकृत केले आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा प्रवास इथे बघता येणार आहे. या दर्शिकेतील प्रदर्शनात विशेष तयार केलेले चलचित्रपट, त्रिमितीय प्रतिमा (होलोग्राम्स) आणि छायाचित्रांच्या प्रती असतील. अंदाजे 50 फूट/35 फूट महाराष्ट्राचा नकाशा लक्ष वेधून घेणारा ठरेल. हा नकाशा भाषेच्या उत्क्रांतीत योगदान देणाऱ्या सर्व प्रतिष्ठित विजेते आणि व्यक्तिमत्त्वांच्या स्थानांचे चित्रण करेल. दर्शिकेच्या 4 मजल्यापैकी 3 मजले तांब्याच्या धातूपासून तयार केलेल्या जाळीने वेढलेले असणार आहे. यासाठी खास मराठी लिपीच्या अक्षरांच्या रचनेतून ही जाळी तयार करण्यात येणार आहे. इमारतीमध्ये 200 क्षमतेचे सभागृह आहे आणि ते तळघरात बांधलेल्या भागात असेल. इमारतीच्या मागील बाजूस बहुमजली वाहनतळ प्रस्तावित आहे. प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र अंदाजे ६५८३ चौ.मी. (७०,८५८ चौ. फूट) एवढे असेल. मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पावर १२६ कोटी रुपये खर्च होणार होते. तसेच हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याची योजना होती, पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठी भाषा भवनाच्या उभारणीचे काम ठप्प झाले. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा या कामाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com