मुंबईत 'पुण्यश्लोक अहिल्या भवन'चे भूमिपूजन; 47 कोटींचे बजेट

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई उपनगर जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन सोहळा मानखुर्द येथील चिल्ड्रन एड सोसायटी संचालित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामार्फत मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून, हे भवन उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि भारतातील पहिल्या अहिल्याभवनात मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. हे भवन उभारण्यासाठी ४७ कोटी इतका खर्च अपेक्षित असून, ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे.

Mumbai
Mumbai : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईकरांना काय दिली गुड न्यूज?

यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मतिथीचे हे ३०० वे वर्ष आहे. आज फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात त्यांच्या कार्याचा नागरिकांना अभिमान आहे. याचेच औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्ह्यात भारतातील पहिले पुण्यश्लोक अहिल्यदेवी भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही भूमिपूजन केले आहे आणि येत्या एका वर्षात त्याचे लोकार्पण सुद्धा आम्ही करू. महिला, युवती आणि बालकल्याणासाठी हे भवन एक आदर्श ठरेल. गरज लागल्यास या प्रकल्पासाठी १०० कोटी सुद्धा देऊन असे स्मारक या ठिकाणी उभारू की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण देशातून लोकं येथे येतील." 

Mumbai
Mumbai : ठाणे-बोरीवली सुसाट! महायुती सरकारचा जाता जाता मोठा निर्णय

राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाणार आहे. येथे संकटात अडकलेल्या, हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे. याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे. 

Mumbai
Mumbai Metro-3 : ॲक्वा लाईनवरून प्रवास करणाऱ्यांना मेट्रो देणार सुखद धक्का!

या अहिल्या भवनाच्या परिसरात मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले खालील कार्यालये असणार आहेत. 

१. बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे एकूण २० कार्यालये या इमारतीत असतील. सद्यस्थितीत यातील बहुतांश कार्यालये मुंबईत भाड्याच्या इमारतीत आहेत. 

२. महिला आयोगाचे मुंबई विभागीय कार्यालय

३. बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचे कार्यालय 

४. बालकल्याण समिती : मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेता, या जिल्ह्यात २ बालकल्याण समिती कार्यरत आहेत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या बाबतीत या समितीला निर्णय घेण्याचे न्यायिक अधिकार असतात. त्यांचे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेली दोन स्वतंत्र कार्यालये या इमारतीत असतील. 

५. बाल न्याय मंडळ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांच्या वाढत्या गुन्ह्यांमधील समावेशाचे प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या दोन बालन्याय मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीत या दोन्ही बालन्याय मंडळांसाठी अद्ययावत सुसज्ज असे कार्यालये असतील.

६. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे मुंबई जिल्ह्याचे कार्यालय : बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वीपणे राबविणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय या इमारतीत असेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com