BKCतील 'त्या' भूखंडांना प्रति चौमी ३ लाख ४४ हजारांचा दर; MMRDAच्या

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : अखेर वांद्रे-कुर्ला संकुलातील त्या दोन भूखंडांच्या विक्रीला मुहूर्त मिळाला. सुमितोमो गोयसू या कंपनीने तब्बल २,०६७ कोटी रुपयांना या दोन भूखंडांचा ८० वर्षांसाठी भाडेपट्टा मिळवला आहे. सी-६९ सी आणि सी ६९ डी हे अनुक्रमे ५,८०७ चौरस मीटर आणि ६०७७ चौरस मीटर क्षेत्रफळाचे आहेत. 'सुमितोमो'ने एमएमआरडीएला प्रति चौरस मीटर ३ लाख ४४ हजार ५०० रुपये इतका विक्रमी दर अदा केला आहे. फेब्रुवारी २०२२ पासून या भूखंडांची विक्री रखडली होती.

Mumbai
निफाड साखर कारखाना चालविण्याचे 25 वर्षांचे टेंडर 'या' कंपनीकडे

वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन भूखंड गेली अनेक वर्षे विक्रीविना पडून होते. देशविदेशातील मोठ्या कंपन्यांनी सुद्धा याकडे पाठ फिरवली होती. अनेकदा टेंडर मागवूनही हे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर एमएमआरडीएने जीएसटी आणि करांमधून सूट दिली होती. एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोसह विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडांची विक्री करून त्या माध्यमातून प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी उभारण्यात येतो. त्यानुसार एमएमआरडीएने बीकेसीतील सी-६९ सी आणि सी ६९ डी हे दोन भूखंड ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात टेंडर मागवले होते; मात्र याकडे कंपन्यांनी पाठ फिरवली होती. यामुळे एमएमआरडीएला अनेकदा टेंडर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची वेळ आली होती.

Mumbai
मुंबई-गोवा मार्गावरील 'या' पट्ट्याचा तिढा मंत्र्यांनी सोडविला फक्त

तरी सुद्धा या टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्याने एमएमआरडीएने अखेर नमते घेत भूखंडाच्या रकमेवरील जीएसटी आणि कराच्या अटी शिथिल केल्या. त्यामुळे हे दोन्ही भूखंड भाडेपट्ट्यावर घेण्यास सुमितोमो गोयसू या कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. त्यानुसार एमएमआरडीएला प्रति चौरस मीटर तीन लाख ४४ हजार ५०० रुपये एवढा विक्रमी दर मिळाला आहे. त्यातून दोन हजार ६७ कोटी रुपयांचा महसूल एमएमआरडीएला मिळणार आहे. सी ६९ सी हा भूखंड ५,८०७ चौरस मीटर आणि सी ६९ डी हा भूखंड ६०७७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून कंपनीला या भूखंडावर ३० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com