जैन इरिगेशनचा मोठा निर्णय; ७८ टक्के जागतिक सिंचन व्यवसाय आता...

Jain Irrigation Systems Ltd
Jain Irrigation Systems LtdTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील बलाढ्य उद्योग समूह असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (Jain Irrigation Systems Ltd.) या जळगाव स्थित कंपनीने आपला जागतिक सिंचन व्यवसाय टेमासेकच्या मालकीच्या रिव्हुलिस कंपनीत विलीन केला आहे. जैन इरिगेशनने कंपनीचा सुमारे 78 टक्के हिस्सा 2900 कोटी रुपयांना विलीन केला. जैन इरिगेशन 12,000 पेक्षा जास्त कर्मचारी व 11,000 डीलर्स आणि वितरकांना रोजगार देते.

Jain Irrigation Systems Ltd
तब्बल 57 वर्षांनी सजली Deccan Queen; असे आहे नवे रंगरूप...

या व्यवहारामुळे जैन इरिगेशनच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठी वाढ झाली. सुरवातीच्या ट्रेडिंगमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. इंट्रा डे मध्ये, कंपनीचे शेअर्स 11.47 टक्क्याच्या वाढीसह 41.80 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड आपला जागतिक सिंचन व्यवसाय टेमासेक कंपनीच्या मालकीच्या रिव्हुलिसमध्ये विलीन करणार आहे. हा करार रोख आणि शेअर्सच्या स्वरूपात असणार आहे. या निर्णयामुळे कंपनीचे एकत्रित कर्ज 2,700 कोटी रुपयांनी किंवा सुमारे 45 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होणार आहे.

Jain Irrigation Systems Ltd
पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रो विस्तारणार ६६ किलोमीटर लांबीचे जाळे

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनचा 4,200 कोटी रुपयांचा जागतिक सिंचन व्यवसाय आहे. यापैकी 2,700 कोटी रुपये संपूर्ण विदेशी कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील आणि 200 कोटी रुपये मूळ कंपनीकडे जातील. विलीन झालेल्या संस्थेमध्ये जैन इरिगेशनचा 22 टक्के इक्विटी हिस्सा असेल, तर रिव्हुलिसचा 78 टक्के हिस्सा असेल, असे ते म्हणाले. हा करार पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि यातून एकत्रित संस्थेसाठी 750 दशलक्ष डॉलर इतका महसूल मिळू शकेल, असेही जैन यांनी स्पष्ट केले.

Jain Irrigation Systems Ltd
७४ कोटींच्या कामावर साचले पाणी; जालनारोडवर नेहमीचीच

सध्या, रिव्हुलिसचा वार्षिक महसूल 400 दशलक्ष डॉलर आहे, तर जैन इरिगेशनचा जागतिक सिंचन व्यवसाय 350 दशलक्ष डॉलर आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेडिंग आणि रिव्हुलिस या जैन इरिगेशन सिस्टिमच्या 100 टक्के मालकीच्या उपकंपनीनेही या संदर्भात निश्चित व्यवहार करार केले आहेत.

Jain Irrigation Systems Ltd
लष्कराची मान्यता न मिळाल्याने पुणे-नाशिक हायस्पीडच्या मार्गात बदल

जैन इरिगेशन सिस्टीम्स हा जळगाव स्थित एक बहुराष्ट्रीय समूह आहे. ही कंपनी 12,000 पेक्षा जास्त कर्मचारी, 11,000 डीलर्स आणि वितरकांना रोजगार देते. कंपनी ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन प्रणाली आणि त्याचे घटक, निरीक्षण आणि नियंत्रणासाठी एकात्मिक सिंचन ऑटोमेशन सिस्टम, डोसिंग सिस्टम, पीव्हीसी आणि पीई पाइपिंग सिस्टम, प्लास्टिक शीट, हरितगृह, जैव-खते, सौर उर्जा यासह वैविध्यपूर्ण उत्पादनांचा विकास, निर्मिती, समर्थन आणि विक्री करते. सोलर वॉटर-हीटिंग सिस्टम, सोलर वॉटर पंप, टर्नकी बायोगॅस प्लांट्स, फोटोव्होल्टेइक सिस्टम आणि टिश्यू कल्चर प्लांट्स. निर्जलित भाज्या, मसाले, एकवटलेली आणि गोठलेली फळे किंवा लगदा यावर देखील कंपनी प्रक्रिया करते. कंपनी टर्नकी प्रकल्प आणि कृषी सहाय्य सेवा देखील देते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com