Mumbai
BMCTendernama

Mumbai : बीएमसीचा क्वालिटी कंट्रोल; मुंबईतील रस्त्यांवर थर्ड पार्टी म्हणून आयआयटीचा वॉच!

Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी नेमणूक करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका आणि आयआयटी यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. अधिक गतीने कामे करताना रस्त्यांची गुणवत्ता ढासळू नये यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मार्गदर्शन करणार आहे.

Mumbai
Ajit Pawar : 'त्या' योजनांना तातडीने मान्यता देऊ; अधिकाऱ्यांनो मिशन मोडवर काम करा

बृहन्मुंबई महापालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात 392 किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात 309 किलोमीटर असे एकूण मिळून 701 किलोमीटर रस्ते काँक्रीटीकरणासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा समावेश आहे. सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबई आयआयटीची गुणवत्ता नियंत्रणासाठी थर्ड पार्टी म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील 5 पॅकेज (शहर विभाग 1, पूर्व विभाग 1 आणि पश्चिम विभाग 3) आणि पहिल्या टप्प्यातील 1 पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केली जाणार आहेत. अधिक गतीने कामे करताना गुणवत्ता ढासळू नये यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मार्गदर्शन करणार आहे, असे भूषण गगराणी म्हणाले.

Mumbai
Mumbai : मुंबईला Grouth Hub करण्याचे शिवधनुष्य पहिल्यांदाच मंत्र्यांऐवजी सचिवांच्या खाद्यांवर!

रस्त्यांच्या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्याकामी आवश्यक सल्ला देणे, प्रत्येक प्रकरणाच्या आधारे आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता आश्वासनासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे आदी कामांची जबाबदारी मुंबई आयआयटीवर सोपविण्यात आली आहे.  

Tendernama
www.tendernama.com