Housing: 'महारेरा'चे खटक्यावर बोट; बिल्डर लॉबीला दणका! 700 प्रकल्प

Maharera
MahareraTendernama

मुंबई (Mumbai) : महारेराने (MAHA-RERA) रेंगाळलेल्या प्रकल्पांबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर विकासकांनी महारेरा संकेतस्थळावरील यादी अद्ययावत केली आहे. त्यानुसार मुंबईत एका महिन्यात तब्बल 700 गृहप्रकल्प (Housing Projects) पूर्णत्वास गेल्याची नोंद झाली असून, प्रकल्प नूतनीकरणासाठीही नवे 705 अर्ज महारेराकडे आले आहेत.

Maharera
Exclusive : मास्टरमाईंड सुनिल कुशिरेला कोणाचा वरदहस्त?

'रेरा' कायद्याच्या कलम 11 नुसार दर तीन महिन्याला प्रकल्पस्थिती महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे अपेक्षित आहे. मात्र विकासक त्याला दाद देत नव्हते. त्यामुळे तब्बल 19 हजारांवर प्रकल्पांना डिसेंबरमध्ये कारणे दाखवा नोटिसा महारेराच्यावतीने बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे जानेवारी महिन्यात तब्बल 700 प्रकल्प पूर्ण झाल्याचे विकासकांकडून संकेतस्थळावर सांगण्यात आले. त्याचबरोबर विकासकांनी 705 प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महारेराकडे अर्ज केले आहेत.

Maharera
Nashik: नाशिकरांसाठी गुड न्यूज; यंदाही दरवाढीचे 'हे' संकट टळले?

मुंबईत अनेक विकासक असून, त्यांच्याकडून गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे, मात्र पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची यादी वेळच्या वेळी अद्ययावत करणे टाळले जाते. त्यामुळे विकासकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे महारेराने रेंगाळलेल्या प्रकल्पांबाबत नोटिसा बजावल्यामुळे त्याचा लाभ गृह खरेदीदारांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता क्षेत्रावरील विश्वास वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

दर महिन्यात सुमारे 125-150 प्रकल्प पूर्ण झाल्याची नोंद महारेरा संकेतस्थळावर होते. त्यानुसार ऑगस्ट 139, सप्टेंबर 169, ऑक्टोबर 134, नोव्हेंबर 116, डिसेंबर 138 आणि जानेवारी महिन्यात ही संख्या वाढून 700 एवढी नोंदवली गेली आहे.

Maharera
Nagpur : फडणवीसांच्या पीएच्या क्वार्टरमध्ये तब्बल 9.50 लाखांचे एसी

प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी आलेल्या अर्जांचे प्रमाणही दिलासादायक आहे. दरमहा ही संख्या सरासरी 120 होती. जुलै 29, ऑगस्ट 138, सप्टेंबर 116, ऑक्टोबर 142, नोव्हेंबर 178 अशी गेल्या पाच महिन्यांची स्थिती होती. डिसेंबर, जानेवारीत ही संख्या 705 वर गेल्याने ही मासिक सरासरी वाढून तिप्पट झालेली आहे.

महारेराच्या इतिहासात एकाच महिन्यात एवढे प्रकल्प पूर्ण झाल्याचे आणि नूतनीकरणासाठी एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com