लोणावळ्यात 'ग्लास स्कायवॉक' उभारणीचे काम 'या' यंत्रणेकडे; 100 कोटींचे बजेट

Glass Skywalk
Glass SkywalkTendernama

मुंबई (Mumbai) : लोणावळ्यात 'ग्लास स्कायवॉक' प्रकल्प उभारण्याच्या हेतूने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. लोणावळ्यात टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे 'ग्लास स्कायवॉक' उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित आहे.

Glass Skywalk
Exclusive : दादा भुसेजी चाललंय काय?; अतिरिक्त बेंचेस असताना ZP शाळांच्या नावाने खरेदीसाठी 5 कोटी (भाग-3)

आतवन या गावातील वन विभागाच्या आठ हेक्टर जागेमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. 'ग्लास स्कायवॉक' हा प्रकल्प पीएमआरडीएने हाती घ्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. यासंदर्भात मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित बैठकही झाली. त्यामध्ये वन खात्याने जागा उपलब्ध करून द्यावी, तर पर्यटन विभागाने प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. प्रकल्पांचे काम पीएमआरडीएने करावे, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Glass Skywalk
Exclusive : दादा भुसेजी चाललंय काय? ठेकेदारांची सोय पाहण्यामागे गुपित काय? (भाग-2)

त्यानुसार पीएमआरडीएकडून सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लोणावळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे 'ग्लास स्कायवॉक' उभारण्याचे प्रस्तावित आहे. येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, ॲम्पी थिएटर, खुले जिम आणि विविध खेळ आदी विविध सुविधा असणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com