Eknath Shinde : नवीन महाबळेश्वर प्रकल्प मिशन मोडवर! एकनाथ शिंदेंनी काय दिले आदेश?

New Mahabaleshwar : सातारा जिल्ह्यातील दरे, मुनावळे तसेच कोयना नदीच्या लगत असलेल्या 214 गावांत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा शिंदे यांनी या बैठकीत आढावा घेतला.
new mahabaleshwar
new mahabaleshwarTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर (New Mahabaleshwar) प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एमएसआरडीसीचे (MSRDC) कार्यालय महाबळेश्वर येथे सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.

new mahabaleshwar
Pratap Sarnaik : प्रत्येक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय; पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, पुसद, वाशिम

शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी आले असता त्यांनी या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा विशेष बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. सातारा जिल्ह्यातील दरे, मुनावळे तसेच कोयना नदीच्या लगत असलेल्या दोनशे चौदा गावात नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा शिंदे यांनी या बैठकीत आढावा घेतला.

यावेळी नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळाचे विकास प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली असल्याने या भागाचा सुनियोजितपणे विकास करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. त्यांचे कार्यालय साताऱ्यात असल्याने स्थानिकांना तिथे वारंवार जाणे अवघड होत होते. स्थानिक ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय तत्काळ महाबळेश्वरमध्ये सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

new mahabaleshwar
Mantralaya 2.0 : सुसज्ज 7 मजली नवीन इमारत बांधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

तसेच यावेळी ग्रामस्थांनी कोयना नदीच्या पत्रातील पाणी हे स्थिर असल्याने येथे चालवण्यात येणाऱ्या बोटींना समुद्रातील बोटींप्रमाणे नव्हे तर वेगळे नियम लावावेत, अशी मागणी केली. तसेच या बोटींना लावण्यात येणारे काही नियम दुरुस्त करून नवीन नियम तयार करावेत, असे सुचवले. त्याबाबत हे नियम तपासून त्यात आवश्यक ते बदल करावे, असे शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथे कोयना नदीवरील पुलाचे तसेच प्रतापगड आणि तापोळा येथे रस्ता रुंदीकरण आणि पर्यटक गॅलरीचे काम सुरू असून या कामांची प्रगती त्यांनी जाणून घेतली. तसेच या कामांचा वेग वाढवून ती लवकरात लवकर पूर्ण करावी असेही सांगितले.

new mahabaleshwar
फडणवीसांची मोठी घोषणा; ‘महाज्योती’मार्फत ‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये एक्सलेन्सी सेंटर उभारणार

या गावात नव्याने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळी स्थानिक नागरिकांना उपजीविकेचे साधन मिळावे यासाठी त्याना तात्पुरत्या स्वरूपात तंबूमध्ये होम स्टे उभारण्याची परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम परवानग्या द्याव्यात असेही सांगितले. तसेच कोयना तीरावर बांबू तसेच इतर झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे असेही सांगितले.

या सोबतच प्रतापगड किल्ल्यावर सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने हे काम तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले होते. प्रतापगड हे शिवछत्रपतींची पावनभूमी असल्याने इथे निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी नव्याने होणारे कामही दर्जेदारच व्हायला हवे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

यावेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख आणि एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com