Devendra Fadnavis : धारावी पुनर्विकास टेंडरमधील अटी-शर्ती ठाकरे सरकारच्या काळातील

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

मुंबई (Mumbai) : धारावी पुनर्विकास टेंडरमधील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारने तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. उलट, आमच्या सरकारने त्यात पारदर्शकता आणली आहे. धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न ठाकरे करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

Devendra Fadnavis
Mumbai : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महापालिकेचे टेंडर; 14 डिसेंबरपर्यंत...

धारावीच्या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पलटवार केला आहे. सगळ्याच गोष्टींना त्यांचा विरोध असून विकासविरोधी भूमिका ठाकरे आणि विरोधक घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवे. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणे घेणे नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसते, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Nashik : 'या' योजनेतील ठेक्यांसाठी चक्क राष्ट्रवादी-उबाठा-शिंदे गटाची अभद्र युती

नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनी पत्राद्वारे सरकारला सूचवली. धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिले टेंडरदेखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केले. त्यानंतर दुसरे टेंडर काढले. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. यातील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारने तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत. गरिबातील गरिबांना घरे मिळता कामा नये, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. टीडीआरची विक्री ही आता कागदावर नव्हे तर डिजिटल पद्धतीने करावी लागणार, हा बदल आम्ही केला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटले होते?
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अदानी समूहावर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले की, धारावीचा विकास झाला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. धारावीच्या पुनर्विकासाबाबत संशय व्यक्त होत आहे. धारावीत असणाऱ्या व्यावसायिकांनादेखील जागा मिळाल्या पाहिजेत. अभ्युदय नगर, वांद्रे रिक्लेमेशन हे देखील अदानीला देण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. केवळ अदानीसाठी सगळे सुरू आहे. वीज बिलाचे कंत्राट देखील अदानीला देण्यात आले आहे. याचा आता सोक्षमोक्ष लावायचा आहे. सगळे अदानीला कसे काय? सगळे उद्योग गुजरातला घेऊन जात आहात मग मुंबईला काय उकिरडा करणार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. शिवसेना ठाकरे गटाकडून अदानी समूहाच्या कार्यालयावर 16 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com