Devendra Fadnavis : 'आमलीबारी' उपसा सिंचनच्या सर्वेक्षणास 288 कोटी

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

मुंबई (Mumbai) : आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण केले जाईल, तसेच योजनेअंतर्गत कामे उपसा सिंचनच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. ६ उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून ५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. या कामाच्या सर्वेक्षणासाठी 288 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत सांगितले.

Devendra Fadnavis
BMC: दर्जेदार रस्त्यांसाठी कठोर अंमलबजावणी; सबटेंडर, जेव्हीला मनाई

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी वसविलेल्या देवमोगरा गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता बांधण्यात आलेल्या आमलीबारी धरणाचे काम पूर्ण करण्याबाबत सदस्य एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की आमलबारी धरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करुन या योजनेत असलेली कामे उपसा सिंचनच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

Devendra Fadnavis
Mumbai : मनपातील रस्त्याच्या कामांचे टेंडर विहित पद्धतीनेच : सामंत

सहा उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाच टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. या कामाच्या सर्वेक्षणासाठी 288 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीची मागणी वाढल्यास त्याची देखील तरतूद करण्यात येईल. आमलीबारी देवमोगरा येथील काम पूर्ण होईपर्यंत येथील प्रकल्पाबाधीत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा अनुदान वाटप करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis
Mumbai : वर्क ऑर्डरनंतर नालेसफाई सुरु; 226 कोटींची तरतूद

280 प्रकल्पाबाधितांसाठी 44 गटांमध्ये सरकारी जमीन, गायरान, विस्तारीत गावठाण आहे. हे वगळता 236 प्रकल्पाबाधितांपैकी 187 प्रकल्पाबाधितांना 227 हेक्टर क्षेत्रासाठी नर्मदा विकास विभाग नंदूरबार यांच्या कार्यालयामार्फत सामूहिक उपनलिकेद्वारे तसेच स्वेच्छा अनुदान सिंचन योजनेंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देण्यात आला आहे. 49 प्रकल्पबाधितांना सिंचन सुविधा अनुदान वाटप करणे बाकी आहे. ते देखील तत्काळ वाटप करण्यात येईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात येईल. तसेच उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com