उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते; कामाचा धडाका सुरु

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

मुंबई (Mumbai) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar
'महारेरा'चा दणका; मुंबईतील बिल्डरकडून ग्राहकाला 6 कोटींची भरपाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले.

Ajit Pawar
Uday Samant: फॉक्सकॉन गेल्याने फरक पडत नाही; 59 हजार कोटींची...

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत. राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांनाही खातेवाटप करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com