Power
PowerTendernama

मागणी वाढल्याने मुंबईच्या वीजपुरवठ्याबाबत BEST चा मोठा निर्णय...

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांकडून वाढणाऱ्या विजेच्या (Power Supply) मागणीमुळे बेस्ट (BEST) प्रशासनाने आणखी 500 मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Power
ऐकावे ते नवलच! नाशिक ZPच्या संगणक प्रणाली टेंडरमध्ये अमेरिकेतील...

यासाठी 'बेस्ट'ने नुकतेच टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे, टेंडर प्रक्रियेतून निवडल्या जाणाऱ्या कंपनीसोबत 25 वर्षांचा वीज खरेदीचा करार करण्यात येणार आहे. यामुळे 'बेस्ट'कडून वीज ग्राहकांना अखंड आणि आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. बेस्टला सध्या 'टाटा' पॉवर (Tata Power) कंपनीकडून 780 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येतो.

Power
Pune: पुणे-नगर महामार्ग खरंच चकाचक होणार का?

'बेस्ट' उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून मुंबई शहरातील निवासी व व्यावसायिक अशा 10 लाख 47 हजार वीज ग्राहकांना नियमितपणे वीजपुरकठा करण्यात येतो. यासाठी 'बेस्ट' प्रशासनाच्या विद्युत विभागातील 5,143 अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस झटत असतात.

'बेस्ट'कडे उन्हाळ्याच्या दिवसात ग्राहकांकडून विजेची मागणी वाढते. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेता जादा वीज खरेदीचा निर्णय घेतला असल्याचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. यासाठी 500 मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी टेंडर मागवण्यात आले असून पात्र कंपनीकडून पुढील 25 वर्षांसाठी वीज खरेदी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Power
नाशिककरांसाठी खूशखबर; इंडिगोची एक जूनपासून 29 शहरांना विमानसेवा

चुकीची मीटर रिडिंग, जादा बिल अशा विविध प्रकारचे मेसेज आता वीज ग्राहकांना मोबाईलवर मिळणार आहेत. यामुळे वीज ग्राहक व बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील कर्मचारी यांच्यात होणारे वाद टळण्यास मदत होणार आहे. तर जूनपासून मुंबई शहरातील 10 लाख 47 वीज हजार ग्राहकांसाठी स्मार्ट वीज मीटर बसवण्यास सुरवात होणार असल्याची माहिती 'बेस्ट' प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com