Mumbai
MumbaiTendernama

Mumbai : बोरीवलीतील 'ती' जागाही धारावी पुनर्विकास प्रकल्पास

Published on

मुंबई (Mumbai) : बोरीवली तालुक्यातील मौजे आक्से येथील तसेच मौजे मालवणी येथील शासकीय जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.

Mumbai
Mumbai : मुंबई महानगरातील 'त्या' प्रकल्पांना 'पीएफसी'ची पॉवर; 31 हजार कोटींचे पाठबळ

या प्रकल्पातील अपात्र झोपडी धारकांची गणना जशी जशी निश्तित होईल, त्याप्रमाणे धारावी पुनर्विकास प्राधिकरण यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे यातील आवश्यक जमिनीची मागणी करावयाची आहे. या मिळकतीस जमीन महसूल अधिनियम त्याचप्रमाणे शासनाने वेळोवेळी घेतलेले सर्व धोरणात्मक निर्णय लागू राहतील. यासाठी सुमारे 140 एकर क्षेत्रापैकी वाटपासाठी उपलब्ध होणारे क्षेत्र धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विशेष हेतू कंपनीकडून घरे बांधण्याकरिता या जमिनीची प्रचलित बाजार मूल्याच्या शंभर टक्के किंमत वसूल करून ती डीआरपी/एसआरए यांना देण्यात येईल.

Mumbai
Mumbai : 2 हजार मुंबईकरांना मिळाले हक्काचे घर! कोणाला लागली म्हाडाची लॉटरी?

वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा-
वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणे, सदस्य संख्या निश्चित करणे तसेच इतर कार्यपद्धती ठरवणे याबाबत निर्णय घेईल. 

Tendernama
www.tendernama.com