सरकारचा मोठा निर्णय; सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

Fastag
FastagTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते.

Fastag
Mumbai : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी अत्याधुनिक डिजिटल लाउंज साकारण्याचा निर्णय

फास्ट टॅग च्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार आहे. पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. फास्ट-टॅग शिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्ट - टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट-टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे.

Fastag
Mumbai : महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प; डीपीआर तयार करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर पथकर वसुली सुरु आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात पथकर वसुल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे. एमएसआरडीसीच्या अखत्यारीत ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात २३ टोल नाके आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com