ठाण्यातील पहिले 'क्लस्टर' मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाण्यातील पहिले 'क्लस्टर' (समूह पुर्नविकास) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या किसननगर परिसरात होणार आहे. आगामी नववर्षाआधीच सिडकोच्या माध्यमातून वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथील दोन युआरपीच्या (अर्बन रिन्ल्यूअल प्लॅन) पुर्ननिर्माणाचा नारळ फुटणार आहे. तीन टप्प्यात येथील क्लस्टर योजना राबवण्याचे नियोजन आहे. यासाठी योजना क्षेत्रातील एकत्रित सर्वेक्षण, लाभार्थी निश्चिती, योजना क्षेत्रातील जमिनींचे संपादन, नागरिकांच्या संक्रमण शिबीरांची व्यवस्था अशा जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यासाठी ठाणे महापालिकेची गडबड सुरु आहे.

Eknath Shinde
प्रतिक्षा संपली; उद्या निघणार अधिवेशनाचे ९५ कोटींचे टेंडर

ठाण्यातील धोकादायक, अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुसह्य घर देण्यासाठी क्लस्टर योजना राबवण्याचे ठरले. युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टरला मंजुरी दिली होती. त्यानुसार, ठाणे महापालिकेने क्लस्टरसाठी ४४ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार केले. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात भूमीपूजन करण्यात आले. मात्र, गेली दोन - अडीच वर्षे यात काहीच झाले नाही. राज्यात सत्ता बदल झाल्याने शिंदे सरकारकडून क्लस्टर योजनेला बळ मिळाले. आगामी नववर्षाआधीच सिडकोच्या माध्यमातून वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथील दोन युआरपीच्या (अर्बन रिन्ल्यूअल प्लॅन) पुर्ननिर्माणाचा नारळ फुटणार आहे. तीन टप्प्यात येथील क्लस्टर योजना राबवण्याचे नियोजन आहे. किसननगर परिसरात मुख्यमंत्री शिंदे यांची कारकिर्द आकाराला आली. क्लस्टर राबवताना येथील रहिवाश्यांना हाजुरीतील संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार आहे. तसेच, एमआयडीसी व अन्य प्राधिकरणांच्या जमिनी घेण्यात येणार असून खाजगी जमीन मालकांचे हक्क अबाधित राखून त्यांच्याही जमिनी क्लस्टरसाठी घेतल्या जाणार आहेत.

Eknath Shinde
भुजबळांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिंदे सरकारकडून मोठा निधी

क्लस्टर योजनेत २०२० पर्यतच्या घरांचा समावेश करीत सामूहिक क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. त्याचबरोबर शहर झोपडपट्टी मुक्त करून सुनियोजित शहर बनवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. क्लस्टरमध्ये इमारती उभारताना सुसज्ज रस्ते, शाळा, उद्यान, रुग्णालयासाठीही नियोजन करून क्लस्टर विकास हा आगामी काळासाठी रोल मॉडेल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. क्लस्टरच्या तुलनेत एसआरए योजनेत अनेक त्रुटी असून एसआरएमध्ये लाभार्थ्याना कमी क्षेत्रफळाची सदनिका दिली जाते. किसननगर येथील क्लस्टर यशस्वी ठरल्यास एसआरए योजनाही मॉडिफाईड केली जाईल. मात्र, यासाठी शासनाकडून धोरणात बदल होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेत नव्याने नियुक्त झालेले आयुक्त अभिजीत बांगर किसननगर 'क्लस्टर'साठी कामाला लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com