Mumbai : कोंढाणे धरणाचे 1318 कोटींचे टेंडर ‘त्या’ कंपनीकडे

CIDCO
CIDCOTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (सिडको) कडून कोंढाणे धरणाच्या बांधकामासाठी १,३१८.८९ कोटींचे टेंडर पॅटेल इंजिनीअरिंग कंपनीला मिळाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सर्वात कमी बोली लावणारा ठेकेदार म्हणून पटेल इंजिनीअरिंगची घोषणा करण्यात आली होती. या धरणामुळे नवी मुंबईत होऊ घातलेला नैना प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासहित 270 गावांना मुबलक पाणी मिळणार आहे.

CIDCO
Pune - Solapur Highway वरील प्रवास होणार सुसाट! 42 किमीच्या उड्डाणपुलामुळे कोंडी फुटणार

टेंडरमध्ये कोंढाणे धरणाच्या सिव्हिल कामांचा समावेश आहे. धरणाची लांबी १,२०९ मीटर आणि उंची ८३ मीटर असेल. याशिवाय, या कराराअंतर्गत संलग्न कामे तसेच हायड्रो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल कामे, ज्यात ३ रेडियल गेट्स आणि इलेक्ट्रिकल व मॅन्युअल गेट कंट्रोल आणि इतर विद्युतीकरण कामांचा समावेश आहे. प्रकल्प ४२ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे गावात आहे. लघु पाटबंधारे घोटाळ्यात अडकलेल्या कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरणाच्या कामाला तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा प्रारंभ होत आहे. सुरुवातीला हे धरण शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत होतं पण आता हा प्रकल्प सिडकोकडे वर्ग करण्यात आला असून या धरणामुळे नवी मुंबईत होऊ घातलेला नैना प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासहित 270 गावांना मुबलक पाणी मिळणार आहे. धरण, प्रभावित होणारे क्षेत्र, विस्थापन आणि पुर्नवसन, जुनी देणी आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.

CIDCO
Mumbai : 66 हजार कोटींचा ‘तो’ मेगा प्रोजेक्ट बीओटीवर राबवणार

2011 मध्ये कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम सुरु होते. कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे कोंढाणे धरणाचे काम अनेक वर्ष स्थगित होते. 2017 मध्ये कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित करण्यात आले. स्थानिकांना 10 टक्के पाणीसाठा, उर्वरित पाणीसाठा सिडकोला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 500 हेक्टरहून अधिक जमीन धरणासाठी देणाऱ्या कर्जतवर अन्याय झाल्याचा आरोप होत होता. दरम्यान धरणासाठी तालुक्यातील चार गावं प्रकल्पबाधित असून आधी कर्जत तालुक्याला पाणी देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com