Ganga Expressway
Ganga ExpresswayTendernama

UP: 594 किमीच्या 'गंगा एक्स्प्रेस-वे'ला केंद्राचा Green Signal

Published on

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (UP) मेरठला प्रयागराजशी (Merath To Prayagraj) जोडण्यासाठीच्या प्रस्तावित सहा लेन रुंद आणि 594 किमी लांबीच्या गंगा एक्सप्रेस-वेच्या कामाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीने मंजुरी दिली आहे. या समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे एक्स्प्रेस वेच्या कामाला गती मिळणार आहे. (Ganga Expressway News)

Ganga Expressway
16 कोटीत उभारणार मुंबईतील 'हा' स्कायवॉक; ऑक्टोबरपासून...

हा एक्स्प्रेस-वे उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठा एक्स्प्रेस वे ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांतून जाणार्‍या या द्रुतगती मार्गामुळे राज्याच्या आर्थिक विकासासोबतच रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे.

Ganga Expressway
Good News! नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला! वाचा सविस्तर...

उत्तर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (UPDA) संचालक मंडळाच्या 75व्या बैठकीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी यूपीडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीशकुमार अवस्थी हे होते. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने गंगा एक्सप्रेस-वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल अवस्थी यांनी आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे गंगा द्रुतगती मार्गाच्या बांधकामाची प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

Tendernama
www.tendernama.com