मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल 'इतक्या' कोटींना भाडेतत्त्वावर

Mumbai

Mumbai

Tendernama

मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील इंदिरा डॉकमध्ये तयार होत असलेल्या मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनलच्या विकास, संचलन आणि देखभाल याकरिता 'पीपीपी' तत्त्वावर या टर्मिनलची संपूर्ण इमारत 192 कोटी रुपयांना 30 वर्षांसाठी खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या क्रुझ टर्मिनलच्या बांधणीसाठी 303.30 कोटी रुपये खर्च केले असून ते येत्या 20 वर्षांत खाजगी ऑपरेटरकडून वसूल करण्यात येणार आहेत.

Mumbai

मुंबई मेट्रो-7 चा पहिला टप्पा महिन्याभरात सुरु

2041-42 या वर्षांपर्यंत वर्षाला सुमारे पाचशे क्रुझ मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलवर लागणार आहेत. वर्षाला 42 लाख क्रुझ प्रवासी देशात येणार असून त्यातील 23 लाख प्रवासी मुंबईला भेट देणार आहेत. सध्या मुंबई ते गोवा जलवाहतूक करणारी अँग्रीया क्रुझ सुरू असून भविष्यात अशा अनेक क्रुझ मुंबईच्या बंदरावर लागणार आहेत. क्रुझ पर्यटनाने मुंबईचा विकास होणार असून मुंबई ही क्रुझ हब बनणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी 'पीएम गतीशक्ती' प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती देताना सांगितले.

Mumbai

मुंबई विमानतळावर तासाला 'इतक्या' विमानांचे लँडिंग-टेकऑफ शक्य

मोठ्या आकारच्या वॉटर टॅक्सीला अजूनही प्रतिसाद मिळत नसून या चालकांनी आता एकत्र येत ऑनलाइन बुकिंगचे ऍप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना खात्रीशीर पर्यायी वाहतूकीचा मार्ग मिळाल्यास ते पैसा खर्च करायला तयार आहेत. वसई खाडी व ठाणे जलवाहतूक सुरू झाल्यास प्रवासी वाढतील. देशात गोवा, कोलकाता व कोचिनमध्ये सर्वाधिक जलवाहतूक होते, कारण सबसिडी दिली जाते. जलवाहतूकीला सबसिडी दिल्यास तिकीटदर कमी होतील असेही पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी स्पष्ट केले.

Mumbai

दुबईच्या धर्तीवर मुंबई फिल्मसिटीचा विकास; 'रिलायन्स'ला का नाकारले?

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचा सांगाडा तयार झाला आहे. 4,15,000 चौरस फूट जागेवर 22 के.व्ही. इलेक्ट्रिक सबस्टेशनसह टॉयलेट, वॉटर टँक व काचेचा दर्शनी भागाचे काम होणार आहे. आता तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. तळमजला अधिक तीन मजल्यांचे बांधकाम दोन वर्षांत होणार. पीपीपी मॉडेलनुसार आंतरराष्ट्रीय क्रुझ प्रवाशांच्या आगमन व निगर्मनासाठी टर्मिनल पहिल्या मजल्यावर बांधले जाईल. कमर्शियल व रिटेल ऍक्टिव्हिटी दुसऱ्या तर डोमेस्टिक पॅसेंजरची सोय तिसऱ्या मजल्यावर होईल.

Mumbai

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे काम वेगाने; 'इतका' खर्च

समुद्राच्या खालून पाईपलाईनने येणाऱ्या नॅचरल गॅसचे उरण येथे जहाजावर फ्लोटिंग स्टोअरेज रिगॅसिफिकेशन करण्याचा प्रकल्प 2025 पर्यंत कार्यरत होणार आहे. त्यामुळे मुंबईत गॅसचे वितरण करणे सोपे होणार आहे. गॅस आयात करताना मायनस 39 डिग्री तापमानात फ्रीज करीत लिक्विडमध्ये रूपांतर करून त्याची वाहतूक होते. परंतु त्याचे सीएनजीत रूपांतर करताना 1 क्युबिक मीटरचा 600 क्युबिक मीटर म्हणजे सहाशे पट वाढतो. त्यामुळे त्याची वाहतूक करताना पुन्हा त्याला लिक्वीड फॉर्ममध्ये आणावे लागते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com