'मुंबई महापालिकेत ठराविक कंत्राटदारांसाठीच होतात टेंडर फ्रेम'

भाजप नेते प्रसाद लाड यांचे महापालिका आयुक्तांना पत्र
Prasad Lad
Prasad LadTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) टेंडर (Tender) प्रक्रिया सर्व नियम आणि केंद्रीय दक्षता आयोगाचे निर्देश डावलून राबवली जात असून त्यामागे ठराविक कंत्राटदारांना (Contractor) फायदा पोहोचवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (Pradas Lad) यांनी केला आहे.

Prasad Lad
टेंडरनामाचा पंचनामा; लॉकडाऊन असूनही 2 कोटींच्या रस्त्याची चाळण

पालिकेच्या टेंडर प्रक्रियांमध्ये उपविधी आणि पूर्व प्रस्थापित पद्धतींचा भंग करत निरोगी स्पर्धाच संपुष्टात आणली जात असल्याचेही लाड यांनी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे.

Prasad Lad
नवी मुंबई विमानतळावरुन २०२४ मध्ये टेक-ऑफ?

मुंबई महापालिकेत टेंडर पूर्व बैठकाच होत नसल्याचे लाड यांनी नमूद केले आहे. टेंडर सूचना पालिकेच्या वेबसाईटवर आल्यानंतर टेंडर धारकांबरोबर बैठक घेतली जाते. त्यात त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी यांची चर्चा होते आणि त्यातून निरोगी स्पर्धा आकाराला येते. त्यातून महापालिकेचे हित साधले जाते. मात्र गेल्या काही काळापासून ही पद्धत मोडीत निघाली आहे. त्यातून आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना टेंडर दिली जातात, असा आरोपही लाड यांनी केला आहे.

Prasad Lad
चांगभल! टेंडर न काढताच मुंबई पालिका मोजणार कंत्राटदाराला २७ कोटी

याबाबत त्यांनी वरळी कोळीवाड्याच्या क्लेव्हलँड बंदर येथे बसविण्याच्या मॅकेनिकल स्क्रीनच्या टेंडरचे उदाहरण दिले आहे. हे टेंडर मक्तेदारी पद्धतीला प्रोत्साहन देणारे आहे. टेंडर मध्ये जी वैशिष्ट्ये नमूद केली गेली आहेत ते उत्पादन फक्त 'इव्हा स्क्रीन्स' या कंपनीकडूनच बनवले जाते. ज्या कंत्राटदाराचा या कंपनीशी करार असेल त्यालाच हे कंत्राट मिळणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टेंडर मधील उत्पादन वैशिष्ट्ये ही कंपनीच्या वेबसाईट वरून महापालिकेच्या वेबसाईटवर जशीच्या तशी कॉपी पेस्ट केली गेली आहेत. महापालिकेच्या या धाडसाला दाद द्यावी तेवढी कमी आहे, असाही टोला लाड यांनी लगावला आहे. हे टेंडर एका ठराविक कंत्राटदाराला डोळ्यासमोर ठेवून काढली गेली असून त्यालाच ती दिली जाईल, अशी चिन्हे आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे सांगताना प्रसाद लाड यांनी महापालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तांवर टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com