मोठी बातमी! बेस्टचे 3675 कोटींचे 'हे' टेंडर 'ऑलेक्ट्रा'च्या खिशात

Olectra Greentech
Olectra GreentechTendernama

मुंबई (Mumbai) : बेस्ट (BEST) बसेसच्या ताफ्यात आता वर्षभरात एकूण २१०० नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात 'बेस्ट'कडून 2100 इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचे टेंडर खिशात टाकले आहे. 3675 कोटी इतक्या किंमतीचे हे टेंडर आहे.

Olectra Greentech
मुंबई-पुणे प्रवासात 1 तास वाचणार! MTHL Extension बाबत मोठी बातमी

'ईव्हीईवाय'ला (Evey Trans Private Limited - EVEY) बेस्टकडून लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) प्राप्त झाले आहे. टेंडरनुसार 12 वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) ऑपेक्स (Opex) मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येईल. 12 महिन्यांच्या कालावधीत बसेस वितरित केल्या जातील. ऑलेक्ट्रा या बसेसची देखभाल देखील कराराच्या कालावधीत करेल.

Olectra Greentech
महाराष्ट्राला एसटीच प्यारी; अवघ्या 18 दिवसात 292 कोटींची कमाई

इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये अग्रगण्य कंपनी असलेली ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या करारानुसार 12 मीटर एसी बसेस पुरवणार आहे. मुंबईत बेस्टसाठी आधीच कंपनीच्या ४० इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. सध्या, ईव्हीईवाय आणि ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड देशातील विविध राज्य परिवहन उपक्रमांमध्ये (STU) इलेक्ट्रिक बस चालवत आहेत. पुणे (PMPML), हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, आणि अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर ह्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत या बसेस आपल्या सेवा बजावत आहेत.

Olectra Greentech
BEST: उत्पन्न वाढीसाठी मोकळ्या जागांबाबत घेतला हा 'बेस्ट निर्णय'

बेस्टने मुंबई शहरात मिशन १० हजार इलेक्ट्रिक बसचे उद्धिष्ट निश्चित केले आहे. बेस्ट प्रशासनाच्या २१०० बसेसच्या कंत्राटाच्या टेंडर प्रक्रियेसाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक, स्वीच मोबिलीटी, पीएमआय, चार्टर्ड स्पीड, जेबीएम, टाटा मोटर, कॉसीस ई मोबिलीटी, कॉन्टीनेंटल या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन कंपन्या टेंडर प्रक्रियेत पात्र ठरल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com