कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

Startup day
Startup dayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी ही गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे आहेत, असे मत नवीन कल्पना, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूक या विषयी द्वितीय चर्चा सत्रात जिओ जेन नेक्स्टचे प्रमुख अमेय माशेलकर, जीतो इनक्युबेशनचे अध्यक्ष जिनेंद्र भंडारी, व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्न, सह-संस्थापक, अपूर्व रंजन शर्मा, सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष अवेंडसचे राणू वोहरा, सह संस्थापक ई व्हि कॅम्प आशिष वाढवणी यांनी व्यक्त केले.

Startup day
Devendra Fadnavis : CM फडणवीस इन अ‍ॅक्शन; अ‍ॅम्ब्युलन्स महाघोटाळा प्रकरणी काय दिले आदेश?

बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांनी केले. या चर्चासत्रात नवीन कल्पना, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूक, शैक्षणिक संस्थांची भूमिका, सर्जनशीलता इत्यादींविषयी सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात स्टार्टअप्सना पूरक असे अनेक घटक आहेत. स्टार्टअप्सची सुरुवात करताना तुम्ही निर्भय असणे आवश्यक आहे. उद्योजकतेतील धोरणात्मक परिणाम उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षेवर अवलंबून असते असे मत आशिष यांनी व्यक्त केले. स्टार्टअप्स शैक्षणिक संस्थांची भूमिका देखील तितकीच महत्त्वपूर्ण असते. आज हे तंत्रज्ञानाचे जग असून नाविन्यता ही केंद्रस्थानी आहे.

Startup day
Mumbai : देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग; ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन

तृतीय चर्चा सत्रात स्टार्टअप्समध्ये महिलांचे सक्षमीकरण' या चर्चासत्रात ओपन सिक्रेटच्या संस्थापिका अहाना गौतम, सुपर बॉटमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उत्तगी, उद्योजिका श्रेया घोडावत, रिचीवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विभा कागाजी यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. सूत्रसंचालन सर्जन सलोनी पटवर्धन यांनी केले. आहाना गौतम या स्वतःचा अनुभव सांगताना म्हणाल्या की, ‘लहानपणापासूनच मी माझ्या आईला माझ्यासाठी काम करताना पाहून तिच्यातून प्रेरणा घेतली. त्यामुळेच मला देखील उद्योग क्षेत्रात यावसं वाटलं. महिलांना काम करताना नेहमी पुरुषांची साथ असते त्यामुळेच महिला देखील पुढे जाऊ शकतात’ असे मत व्यक्त केले. वैयक्तिक आलेले अनुभव आणि समाजातील अनुभव यातून महिला उद्योजक देखील स्टार्टअप्समध्ये येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महिला ही जबाबदारीने काम करत आहेत. कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करता येऊ शकते  हे महिलांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटून सिद्ध केले आहे, असे मत महिला उद्योजकांनी यावेळी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com