Andheri Sports Complex: शहाजीराजे क्रीडा संकुलात मल्टीपर्पज सिने-नाट्यगृह उभारा

५६ खोल्यांचा बेकायदा वापर आणि अव्वाच्या सव्वा फी आकारणी केल्याने ललितकला प्रतिष्ठान चौकशीच्या फेऱ्यात; मराठी नाटक व सिनेमांसाठी स्वतंत्र जागेची आमदार अमित साटम यांची मागणी
BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई महापालिकेने अंधेरी (पश्चिम) येथे १९८८ मध्ये बांधलेल्या शहाजीराजे क्रीडा संकुलात चित्रपट व नाटकांसाठी मल्टीपर्पज सभागृह उभारावे, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष स्थानिक आमदार अमीत साटम यांनी केली.

BMC
Mumbai: बीएमसीने वाटप केलेल्या ‘त्या’ शाळांच्या भूखंडांचे वाटप रद्द करा

महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, साटम व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकतीच शहाजीराजे क्रीडा संकुलाची पाहणी करुन व्यवस्थापनाच्या कारभाराची झाडाझडती घेतली. संकुलातील ५६ खोल्यांच्या बेकायदा वापराबाबत चौकशी करण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले. तसेच वैयक्तिक मालमत्ता म्हणून वापर करण्याऐवजी मुंबईकरांकरिता त्याचा उपयोग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे साटम यांनी सांगितले. 

या संकुलाचे व्यवस्थापन ललितकला प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येते. येथील सुविधांसाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेतले जाते तसेच येथील ५६ खोल्यांचा गैरवापर करण्यात येत आहे, अशा स्थानिकांच्या तक्रारी होत्या.

BMC
Mumbai Infrastructure: 2027 पर्यंत मुंबईतील 93 टक्के रस्ते सिमेंटचे होणार; कोणी केला दावा?

यावेळी शिष्टमंडळाने महापाालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्याबरोबर बैठक घेतली. येथील टेबल टेनिस कोर्ट, खुले मैदान, कार्डिओ व्यायाम शाळा, जिमनॅस्टीक हॉल, जलतरण तलाव, ५६ खोल्या आदींच्या वापराबाबत नागरिकांसाठी शुल्काची मनमानी करण्यात येणे, खेळाडूशी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन आणि ५६ खोल्यांचा गैरवापर याची चौकशी करण्याचे निर्देश या भेटीदरम्यान दिल्याचे आमदार साटम यांनी सांगितले. 

या संकुलात नाट्यागृह व सिनेमागृह बांधण्याची अनेक वर्षापासून मागणी आहे. त्यासाठी संकुलात पुरेशी जागा उपलब्ध आहे. हे नियोजित नाट्यगृह मल्टीपर्पज असेल. मराठी नाटक, सिनेमांसाठी ते राखीव ठेवता येईल. सिने-नाट्यगृहाच्या या प्रकल्पाला महापालिका प्रशासने गती द्यावी, अशी मागणी या बैठकीमध्ये आमदार अमीत साटम यांनी केली.

Tendernama
www.tendernama.com