नवी मुंबईतील 'त्या' दोन प्रकल्पांसाठी आचारसंहितेनंतर टेंडर, 900 कोटींचे बजेट

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)Tendernama

मुंबई (Mumbai) : वाशी येथे सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनासह बेलापूर येथील नवी मुंबई महापालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधकामाची टेंडर प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्र भवनसाठी सुमारे १०० कोटी तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Mumbai Ahmedabad Bullet Train News : समुद्राखाली तयार होतोय बोगदा; काम युद्धपातळीवर सुरू

या दोन्ही वास्तूंची टेंडर प्रक्रिया त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या निवेदनावर चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना हे निर्देश दिले. राज्य सरकारकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर प्रस्तावित महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १४ माळ्यांची व सर्व सोयी सुविधांयुक्त असणार आहे. नियोजित महाराष्ट्र भवनामध्ये व्हीआयपी रूम तसेच लोकप्रतिनिधींसोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही रूमही असणार आहेत. त्याचबरोबर विविध भागांतून येणाऱ्या विद्यार्थी, अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा असणार आहेत. या भवनासाठी २०१४ पासून आमदार म्हात्रेंनी पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटींची तरतुदीची घाेेषणाही केली होती.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Mumbai : पावसाळी खड्ड्यांसाठी बीएमसीचे 250 कोटींचे बजेट; खड्डे शोधण्यासाठी अभियंत्यांचा दुचाकीवरून फेरफटका

नवी मुंबई महापालिका बेलापूर सेक्टर १५ मध्ये हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प ८.४० एकरांमध्ये उभारणार आहे, त्यासाठी सुमारे ८१९ कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी सीएसआर निधींचाही प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीच्या भूखंडाची किंमतही आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडून कमी करून घेतली आहे. ५०० खाटांचे हे रुग्णालय राहणार असून तळमजला अधिक ९ मजली असणार आहे. या ठिकाणी कर्करोग, हृदयरोग, मेंदूविकार अशा अनेक मोठमोठ्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. शिवाय पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com