Adani : धारावीत 'अदानी'ची दडपशाही सुरू! कोणी केला आरोप?

Dharavi, Adani
Dharavi, AdaniTendernama

नागपूर (Nagpur) : धारावी पुनर्विकास योजनेचे (Dharavi Redevelopment Project) काम मिळालेल्या अदानी (Adani) उद्योग समूहाकडून धारावीतील रहिवाशांवर दडपशाही सुरू आहे. त्यासाठी माजी पोलिस अधिकारी आणि चकमक फेम यांना नेमून धारावी परिसरात दहशतीचे वातावरण पसरवले जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikawad) यांनी सोमवारी (ता. ११) विधानसभेत केला.

Dharavi, Adani
Chhagan Bhujbal : हिवाळी अधिवेशनातून आली नाशिक जिल्ह्यासाठी गुड न्यूज!

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी शून्य प्रहारात धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मांडला. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आले आहे. एखाद्या बिल्डरची नजर वस्तीवर असते तेव्हा त्या ठिकाणी दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, हे आपण चित्रपटात पाहतो. परंतु, आज धारावीकर हे प्रत्यक्षात अनुभवत आहेत, असे गायकवाड म्हणाल्या.

Dharavi, Adani
Sambhajinagar : महानगरपालिका होणार मालामाल; रखडलेल्या 'त्या' प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू

धारावीमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या वस्तींना नोटीस दिल्या जात आहेत. धारावीतील लोकांकडे ’मशाल’ या संस्थेचा सर्वेक्षण अहवाल असून, एकही सुनावणी झालेली नसताना पोलिस येऊन दडपशाहीचे वातावरण निर्माण करतात. त्यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रकल्प करण्याआधी तेथील लोकांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने अदानी समूहाला निर्देश द्यावेत आणि लोकांचे पुनर्वसन कुठे करणार हे सांगावे, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com