सीएसएमटीचा पुनर्विकास 'या' नव्या मॉडेलद्वारे; 1800 कोटींचे बजेट

CSMT
CSMTTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : युनेस्कोच्या जागतिक वारसायादीत समाविष्ठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (CSMT) पुनर्विकास आता नव्या पीपीसी मॉडेलद्वारे होणार आहे. याआधी या हेरीटेज स्थानकाचा विकास हायब्रीड बिल्ड ऑपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सफर तत्वावर होणार होता. आता तो 'पीपीसी' तत्वावर केंद्र सरकारच करणार असून 1800 कोटींचे बजेट त्यासाठी निश्चित केले आहे.

CSMT
मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प गुंडाळला? आता या मार्गावर होणार...

सीएसएमटी या स्थानकाचा पुनर्विकास यापूर्वी पीपीपी म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक सहभागातून होणार होता. त्यानंतर 40 टक्के रेल्वे व 60 टक्के खाजगी सहभागातून त्याचा विकास करण्यास नीती आयोगाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यामुळे 1600 कोटी ऐवजी त्यास 1350 कोटी रूपये खर्च येणार होता. आता थेट 1800 कोटी रूपयांचे बजेट त्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

CSMT
पुणे : साफसफाईच्या टेंडरमध्ये घोळ; त्याच ठेकेदाराला काम देण्यासाठी

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी याआधी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरएसडीसी) पीपीपी अ‍ॅप्रायझल कमिटीच्या तत्वत: मंजूरीनंतर ऑगस्ट 2020 मध्ये (आयआरएसडीसी) 'आरएफक्यू' टेंडर मागविले होते. 15 जानेवारी 2021 रोजी आयआरएसडीसीने आरएफक्यू टेंडर उघडले होते. कोविड काळात दहा बड्या कंपन्यांनी त्यासाठी स्वारस्य दाखविले होते. या कंपन्यांची छाननी करून टेंडरच्या पुढील टप्प्यासाठी यातील 9 कंपन्यांची निवड झाली होती. अदानी, गोदरेज आणि ओबेरॉय यांसह ९ कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर रेल्वे बोर्डाने नोव्हेंबर 2021 मध्ये आयआरएसडीसी कंपनी बंद करून ते रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथिरिटी (आरएलडीए) मध्ये विलीन केले. आता रेल्वे लँड डेव्हलमेण्ट अथोरिटीकडून सीएसएमटीचा पुनर्विकास केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.

CSMT
फडणवीसांनी पुन्हा आणले; मुंबई मेट्रोची जबाबदारी अश्विनी भिडेंकडे

ऐतिहासिक दर्जा असलेल्या सीएसएमटी स्थानकात उपनगरीय रेल्वेसाठी सात फलाट आहेत. येथून सीएसएमटी ते कसारा, खोपोली मुख्य मार्गाबरोबरच हार्बर पनवेल लोकलही सुटतात. याशिवाय मेल, एक्स्प्रेससाठीही फलाट आहेत. या स्थानकात मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. शिवाय या रेल्वे स्थानकाला परदेशी पर्यटकही भेट देतात. अशा स्थानकाचा पुनर्विकास करताना ऐतिहासिक वारसा जपण्यात येणार आहे. पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे, स्थानक अपंगस्नेही करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे, स्थानकाची पुनर्बाधणी आणि डागडुजी करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर सीएसएमटी परिसरात 'रेल मॉल'ही उभारण्याचा विचार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com