Mumbai : मलबार हिल्सच्या 'त्या' प्रसिद्ध बंगल्याचे काऊंटडाऊन सुरु

12 मजली सी व्ह्यू लक्झरी अपार्टमेंट उभारणार
Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : विधानसभेचे सभापती आणि उपसभापती तसेच विरोधी पक्ष नेते आणि आमदारांच्या निवासस्थानासाठी मुंबईतील प्रसिद्ध मलबार हिल्स येथील 'अजंठा' बंगला पाडण्यात येणार आहे. तब्बल ६ हजार ५०० स्केअर फूट जागेत हे लक्झरी १२ मजली सी व्ह्यू अपार्टमेंट उभारले जाणार आहे. या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली असून टेंडर आणि इतर बाबी अंतिम करण्यासाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला जाणार आहे.

Mumbai
EXCLUSIVE : आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोप केलेले चंद्रकांत गायकवाड आहेत तरी कोण?

मलबार हिल्स येथील नारायण दाभोलकर मार्गावरील अजंठा बंगला हा लवकरच पाडला जाणार आहे. या ठिकाणी विधान सभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींसाठी निवासस्थान उभारले जाणार आहे. यातील सहा अपार्टमेंट निवासस्थान म्हणून वापरल्या जातील, तर उर्वरित सहा इतर राज्यांतील मान्यवरांसाठी गेस्ट हाऊस म्हणून वापरल्या जाणार आहेत. या नव्या इमारतीत एक सभागृह आणि स्टाफ क्वार्टर्स व्यतिरिक्त अत्याधुनिक व्यायामशाळा सारख्या सुविधा देखील बंदण्यात येणार आहेत.

Mumbai
Vasai Virar : 40 ई-बससाठी तिसऱ्यांदा Tender काढण्याची पालिकेवर नामुष्की

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यासंदर्भात म्हणाले की, या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच टेंडर आणि इतर बाबी अंतिम करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला जाणार आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी देण्यात आलेला अजिंठा बंगला सध्या रिक्त आहे. त्या जागेवर बारा मजली अपार्टमेंट्स तयार करण्यात येणार असून जागा देखील वाचणार आहे. नार्वेकर म्हणाले की, जुन्या बांधकामांना जास्त देखभालीची गरज असते. त्याचा खर्च देखील जास्त असतो. नवीन बांधकामामुळे त्या खर्चात बचत होईल. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना कायमस्वरूपी निवासस्थाने मिळतील आणि त्यांना बंगल्यांचे वाटप होण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग करणार की महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण करणार यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. 

Mumbai
Mumbai Goa Highway : आता कशेडी घाट 15 मिनिटांतच सुसाट! अखेर बोगद्याची सिंगल लेन...

विधानसभेत २८८ आमदार आहेत. तर विधान परिषदेचे ७८ सदस्य आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना अधिकृत बंगला तसेच निवासस्थान देतांना अडचणी होतात. जर मंत्रिमंडळ ३० पेक्षा जास्त असेल तर बंगल्याचे वाटप करतांना अडचणी येतात. अनेकदा विरोधी पक्षांच्या नेत्यांना छोट्या फ्लॅट्समध्ये जुळवून घ्यावे लागते. या नव्या प्रकल्पामुळे त्यांना कायमस्वरूपी फ्लॅट मिळणार असल्याने त्यांची होणारी गैरसोय टाळणार आहे. गेल्या महिन्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह नार्वेकर आणि परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी नरिमन पॉइंट येथे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या नवीन मनोरा आमदार निवस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. या ठिकाणी ४० आणि २८ मजल्यांच्या दोन उंच इमारती बांधल्या जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com