Sambhajinagar : जागतिक बॅंक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रांना महापालिकेकडून केराची टोपली

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : येथील शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामात महापालिका प्रशासनाचा कमालीचा हलगर्जीपणा समोर येत असल्याचे टेंडरनामा तपासात पुढे आले आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गात शिवाजीनगर चौक ते देवळाई चौक या लांबीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या भुमिगत मलनिःसारण वाहिनीची दुरूस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांनी २० ऑक्टोबर २०२३ ते २४ एप्रिल २०२४ पर्यंत सलग पाचव्यांदा पत्र व्यवहार केला. मात्र महानगरपालिका प्रशासन टोलवा टोलवी करत असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.‌विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात या भुयारी मार्गाबाबत दोन जनहित याचिका क्रं. ९६ / २०१३ , ४८/२०१७ टाकलेल्या आहेत. प्रकरण अद्याप सुरू आहे. याचा उल्लेख देखील कार्यकारी अभियंत्यांनी केला आहे, तरिही महानगरपालिका प्रशासन बधत नाही.

Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : चंपाचौक ते महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत रस्त्याचे भिजत घोंगडे कायम

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पामार्फत भुयारी मार्गाला जोडणारे सिमेंट रस्ते, भिंत व ईतर कामांसाठी काॅन्ट्रेक्टर जी.एन.आय. कंन्स्ट्रक्शन कंपनीला २५ ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.या भुयारी मार्गाच्या बांधकामात अडथळा ठरत असलेल्या काही मलनिःसारण व पाण्याच्या भूमिगत लाईन्स स्थलांतरित करण्याबाबत २० ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२३ ते १२ जानेवारी, १५ मार्च, २४ एप्रिल २०२४ रोजी जागतिक बॅंक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगरपालिका प्रशासनाला पाचव्यांदा पत्र व्यवहार केला.‌पत्रांसह तोंडी देखील विनंती करण्यात आली.भुयारी मार्गाच्या बांधकामाच्या १२ महिन्याच्या कालावधीपैकी सहा महिन्याचा कालावधी संपलेला आहे.‌परंतु महापालिका प्रशासनाने अद्यापही नियोजित ड्रेनेज लाईन्स व वाटर लाईंन्स स्थलांतराचे काम अपूर्ण ठेवले आहे. रेल्वे ट्रॅकपासून शिवाजीनगर बाजूस महानगरपालिकेने महिन्याभरापूर्वी स्थलांतरित करण्यात आलेल्या मलनिःसारण वाहिनीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप थेट कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या एका पत्रात उल्लेख केला आहे.त्यात पाईप लाईन टाकण्यापूर्वी खाली कुठलेली बेड काॅक्रीट केले नाही.‌किंवा पि.सी.सी. करण्यात आलेले नाही. तसेच या मलनिःसारण वाहिनीच्या वरून जात असलेली पाण्याची लाईन लिकेज असून त्या ठिकाणी पाण्याच्या ओलाव्यामुळे काळी माती ढासळून खालच्या ड्रेनेज लाईनच्या मातीचे सपोर्ट निघाल्यामुळे वारंवार मलनिःसारण वाहिनी लिकेज होत आहे व‌ त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.‌

Sambhajinagar
Sambhajinagar : सुखना धरणाचे दु:ख कोणाला कळणार?; देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा

सततच्या मलनिःसारण वाहिनी लिकेजमुळे भुयारी मार्गाच्या कामात वारंवार अडथळा येत असल्यामुळे जागतीक बॅंक प्रकल्पामार्फत तीन वेळा लिकेज बंद करण्यात आले होते. सदर मलनिःसारण वाहिनी बंद करण्याबाबत २४ एप्रिल २०२४ रोजी जागतिक बॅंक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगरपालिका प्रशासनाला कळवले होते. मात्र त्याकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही. भुयारी मार्गाचे खोदकाम करताना सर्व बाजूंनी आवश्यक अंतर सोडलेले आहे. मात्र वाटर लाईन्स लिकेजमुळे त्याच बाजूने माती ढासळत आहे व इतर ठिकाणी काहीही झालं नाही. परंतु महानगरपालिका प्रशासनाकडुन मलनिःसारण वाहिनी बंद करण्याऐवजी अनावश्यक पत्रव्यवहार करून जबाबदारी टाळण्याचे काम होत असल्याचा आरोप कार्यकारी अभियंत्यांनी केला आहे. सदर भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खंडपीठात दाखल जनहित याचिकेत कामाच्या प्रगतीबाबत सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करून जागतिक बॅंक प्रकल्पाच्या माध्यमातून कामाची प्रगती साधण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जात आहे. तथापी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक प्रतिसाद मिळत नाही. परिणामी भुयारी मार्गाच्या कामाची प्रगती मंदावली आहे. जागतिक बॅंक प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकात पाणी उपसण्याचा समावेश नसताना देखील दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून भुयारी मार्गाच्या कंत्राटदाराकडून गेल्या एक महिन्यापासून सातत्याने पंप लाऊन सदर पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. तसेच सदर मलनिःसारण वाहिनी बंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाला मोफत यंत्रसामुग्री व सिमेंटचे मटेरियल तसेच आवश्यक त्या बाबी कंत्राटदाराराकडून पुरवून देखील महापालिका प्रशासन सहकार्य करण्याऐवजी जबाबदारी ढकलत असल्याचा खेद कार्यकारी अभियंत्यांनी थेट पत्रात व्यक्त केला आहे. यात एकमेकांच्या परस्पर सहकार्याने व समन्वयाने छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासासाठी व जनहिताच्या कामासाठी आवश्यक कामात कार्यवाहीच्या अपेक्षेसह विनंती करण्यात आलेली आहे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com