बीड बायपास रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत लोकप्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांचे मौन का?

Road
RoadTendernama

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठणरोड जंक्शन महानुभाव आश्रम चौक ते झाल्टा फाटा - कॅम्ब्रीज चौक, झाल्टा फाटा - आडगाव निपाणी नाका या रस्त्याचा 'हायब्रीड ॲन्यूटी' प्रकल्पातून सुरू असलेल्या कामांचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जवळपास चारशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेला हा सिमेंट रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच तडकायला सुरुवात झाली असून, या रस्त्यावर जागोजागी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत आणि सरफेस उखडायला सुरुवात झाली आहे. आधीच उंच दुभाजक त्यात चुकीचे उड्डाणपूल यासोबतच आता सर्व्हिस रस्त्यांवर लावलेले लोखंडी बॅरिकेड्स वाहनांच्या धडकेने वाकल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सर्व्हिस रस्त्यांवर वाहनांची अवैध पार्किंग सुरू झाली आहे.

Road
''स्मार्ट मीटर' म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी! पैसा ग्राहकांचा, मालकी 'अदानीं'ची'

पैठण जंक्शन - झाल्टा फाटा - कॅम्ब्रीज चौक - झाल्टा फाटा - आडगाव निपानी नाका ॲन्युटी हायब्रीड प्रकल्पांतर्गत बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेला, हा सिमेंट रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडकायला सुरुवात झाली असून, या रस्त्यावर जागोजागी मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. या रस्त्याची लाचलुचपत आणि केंद्रीय गुणनियंत्रण दक्षता पथकामार्फत तपासणी करण्याची मागणी सातारा - देवळाईतील नागरिकांनी केली होती.

या रस्त्याबाबत गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी देखील विधानसभेत आवाज उठवला होता. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या निकृष्ट रस्त्याची पाहणी केली होती. नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र पुढे या रस्त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही.

Road
Nagpur : स्मार्ट प्रीपेड मीटर्स; वादग्रस्त 'मॉन्टे कार्लो' कंपनीला टेंडर

जून २०२० मध्ये सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम छत्रपती संभाजीनगर शहरातील 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर' या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. काम सुरू होऊन जवळपास तीन वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप या रस्ताचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही.

विशेष म्हणजे, एकीकडे काम शिल्लक असताना सिमेंट रस्त्याला जागोजागी तडकला असून, मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. यामुळे या संपूर्ण सिमेंट रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, "हायब्रीड ॲन्युटी" प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सातारा - देवळाईकरांनी दिला होता.

Road
Bullet Train News : BKC ते शिळफाटा बोगद्याचे काम मिशन मोडवर; घणसोलीतील 'ती' मोहिम फत्ते!

तटस्थ यंत्रणेकडून दर्जा तपासा अशी विनंती देखील करण्यात आली होती. सुरू असलेल्या विकास कामाविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र सुरू असलेल्या कामांचा दर्जा तपसणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही तसदी घेतली नाही. या रस्त्याच्या तपासणीसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या दर्जा तपसाणीवर देखील संशय बळावत आहे.

एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे आता सर्व्हिस रस्त्यातील लोखंडी बॅरिकेड्स देखील वाहनांच्या धडकेत वाकल्याने व सर्व्हिस रस्त्यावर वाहनांनी कब्जा केल्याने बायपास कोणासाठी बांधला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com