औरंगाबादेत एकाच ठेकेदाराला दोन्ही टेंडर देण्यासाठी नियमांना बगल?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील पडेगाव, नारेगाव, चिकलठाणा आणि हर्सुल येथील कचराडेपोत लाखो टन साचलेल्या कचऱ्यावर 'टेंडरनामा'ने सातत्याने वृत्तमालिकेद्वारे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याच दखल घेत राष्ट्रीय हरीत लवादाने (NGT) त्यावर उपाययोजना करायचे आदेश दिले होते. मात्र या कामाच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ असल्याचे दिसून येत आहे.

Aurangabad
औरंगाबादकरांना मोठा दिलासा; आता आषाढी एकदशीपासून पाणी...

पहिल्या व दुसऱ्या टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हणत महापालिकेच्या यांत्रिकी विभागातील कार्यकारी अभियंता आर. ई. पंडीत, उप अभियंता अमोल कुलकर्णी यांनी नियमाला बगल देत तिसऱ्या फेरीत दोनच टेंडर आलेले असताना तांत्रिक बीड ओपन केले. त्यात सद्यस्थितीत चिकलठाणा आणि पडेगाव कचरा प्रकल्पाचे काम पाहणारे मायोवेल्स कंपनीचे किशन भाटी आणि अहमदाबादेतील निल स्टीलचे निलराज नानालाल वर्सानी या दोनच ठेकेदारांचा समावेश आहे. केवळ भाटी यांनाच या कामाचे टेंडर मिळावे यासाठी महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने खटाटोप केल्याची महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मर्जीतल्या ठेकेदारालाच हे काम मिळणार असल्याचे वृत्त टेंडरनामाने प्रकाशित केले होते. आणि नेमके तसेच घडत असल्याचे दिसून येत आहे.

Aurangabad
औरंगाबादेत स्मार्ट सिटीकडून इलेक्ट्रिक बसचे फिल्ड ट्रायल सुरू

महापालिकेच्या नारेगाव, पडेगाव, हर्सुल व चिकलठाणा येथील डेपोत सुमारे लाखो मेट्रिक टन कचरा विनाप्रक्रिया पडून आहे. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातील आलेल्या निधीतून दोन कोटी रिपये खर्च करून बायोमायनिंग मशिन खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार बायोमायनिंग मशिन खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागातील उप अभियंता जी. पी. पाटे यांनी ४ ऑगस्ट २१२१ रोजी हरियानातील गुरगाव येथील राईटींग इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीने सादर केलेल्या २ कोटी ६ लाख ५० हजार रुपयांच्या दरपत्रकाला तांत्रिक मान्यता देखील दिल्यानंतर ११ एप्रिल २०२२ रोजी लेखाधिकारी संजय पवार यांनी वित्तीय मान्यता दिली. त्यानंतर महापालिकेच्या तांत्रिक विभागाने मशीनची तपासणी करून २२ एप्रिल २०२२ रोजी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर प्रशासकांनी २७ एप्रिल रोजी प्रशासकीय मान्यता दिली.

Aurangabad
तब्बल १३ वर्षांपासून रखडला १४ कोटींचा रस्ता

प्रि- बीड बैठकीत एक वाक्यता

त्यानंतर शहर अभियंता सखाराम पानझडे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाघुले, घन कचरा विभागाचे उपायुक्त सोमनाथ जाधव, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पंडीत यांच्यात निश्चित केलेल्या दरपत्रकातील मशीन खरेदी करण्याईतपत योग्य का? तिच्यात काही त्रुटी आहेत का, प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी टेंडरपूर्व प्रि-बीड बैठक झाली होती. यात औरंगाबादच्या तिरुपती इलेक्ट्रीकल कंपनीचे मुसळे हे एकमेव ठेकेदार उपस्थित होते. त्यात मशीनचे स्पेसिफिक तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करत वजन, क्षमता आणि पाॅवर, लांबी, रुंदी व उंची यावर सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. यानंतर यांत्रिकी विभागामार्फत ९ मे २०२२ रोजी टेंडर प्रकाशित करण्यात आले.

Aurangabad
वांद्रे टर्मिनस ते खार रोडला जोडणारा 'तो' पूल खुला!

टेंडर पे टेंडर

मात्र बैठकीला उपस्थित असलेला ठेकेदार मुसळे यांनी टेंडर भरलेच नाही. महिन्याभराच्या कालावधीत केवळ एका इच्छुकांने टेंडरमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर ६ जून रोजी फेरटेंडर काढण्यात आले. त्यातही केवळ एकच इच्छुकाने टेंडर भरले. त्यानंतर तिसऱ्यांदा फेर टेंडर काढण्यात आले. यात दोन ठेकेदार सहभागी झाले. यात चिकलठाणा, पडेगाव येथील कचरा प्रकल्पाचे काम पाहणारे मायोवेल्स कंपनीचे किशन भाटी यांचा समावेश आहे.

तिसऱ्या फेरीत नियमांना बगल

कुठलिही टेंडर प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यासाठी तीन ठेकेदारांची आवश्यकता असताना तिसऱ्या फेरीत दोनच ठेकेदारांवर समाधान व्यक्त करत यांत्रिकी विभागाने टेंडर ओपन केले आणि तांत्रिक तपासणी सुरू केल्याचा खटाटोप देखील सुरू केला आहे. यावरून औरंगाबादेतील मायोवेल्स कंपनीलाच हा ठेका मिळावा, मशिन त्यांच्याचकडून खरेदी करायची आणि पुढे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा कोट्यवधीचा ठेकाही त्यालाच द्यायचा, यावर महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी इरादा स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com