तुळजापूरला मिळणार अत्याधुनिक नवीन विश्रामगृह

कामाला गती देण्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे निर्देश
shivendraraje bhosale
shivendraraje bhosaleTendernama
Published on

मुंबई (Mumbai): तुळजापूर येथील नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या बांधकामाला गती देऊन ते आधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या पार्श्वभूमीवर भाविक, मान्यवर तसेच शासकीय अधिकारी यांच्या निवासाची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित नवीन विश्रामगृहाचे बांधकाम दर्जेदार आणि आधुनिक पद्धतीने करण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.

shivendraraje bhosale
सिन्नरमध्ये चिंचोलीत नवे इंडस्ट्रियल टाऊन; NMRDAचे 41 कोटींचे टेंडर

या संदर्भात मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या दालनात आढावा बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

तुळजापूर येथे प्रस्तावित नवीन विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. सुमारे ३,३६६ चौ.मी. एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या या इमारतीचे बांधकाम G+2 स्वरूपाचे असणार असून प्रत्येक मजल्यावर निवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पाचे अंदाज तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहे.

shivendraraje bhosale
Koyna Tourism Satara: कोयना जलाशयावर उभारणार देशातील सर्वात मोठे जलक्रीडा केंद्र; मुनावळे प्रकल्पासाठी मंत्री ॲक्शन मोडमध्ये

विश्रामगृहाच्या बांधकामामध्ये गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तुळजापूरचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन प्रस्तावित विश्रामगृह हे आधुनिक सुविधांनी युक्त, सुरक्षित, आकर्षक आणि दर्जेदार असावे, यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी बैठकीत विशेष भर दिला.

विश्रामगृहामध्ये सोलर लाईट पॅनलची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच संपूर्ण इमारतीसाठी सेंट्रलाइज्ड वातानुकूलित प्रणाली बसविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक बांधकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा योग्य समन्वय साधून या प्रकल्पाचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

shivendraraje bhosale
Mumbai: पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त रस्ते व पुलांची आयआयटीमार्फत तपासणी

“तुळजापूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या भाविक, मान्यवर आणि शासकीय अधिकारी यांच्यासाठी निवासाची सुविधा अत्याधुनिक आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. प्रस्तावित नवीन विश्रामगृहाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होण्यासोबतच त्यामध्ये सोलर ऊर्जा, सेंट्रलाइज्ड वातानुकूल प्रणाली आणि आवश्यक आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात यावा. तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोरपणे तपासणी करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तुळजापूर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाढती संख्या, शासकीय तसेच प्रशासकीय गरजा आणि शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता या नवीन जिल्हा विश्रामगृहामुळे निवासाच्या सुविधेत मोठी भर पडणार आहे.

Tendernama
www.tendernama.com