छत्रपती संभाजीनगरात बेशिस्त वाहनधारकांकडून लाखांचा दंड वसूल; तरिही वाहतूक कोंडी?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील रस्त्यांवर दुचाकी चारचाकी वाहने उभी राहतात. त्यामुळे इतर निरपराध वाहनधारक पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो.‌ त्यामुळे महापालिकेने या समस्येची जड मुळापासून उपटून काढण्यासाठी स्वतंत्रपणे टेंडर काढले. शहरातील ॲक्टीव्ह मोटर्सला काम देण्यात आले.‌ त्याने दहा महिन्यात २० हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करत महापालिकेला १२ लाखाची कमाई करून दिली. महापालिकेच्या तिजोरीत पैसा जमा झाला असला तरी छत्रपती संभाजीनगरकरांना त्याचा काही उपयोग झालेला नाही... कारण शहरात वाहतूक कोंडीची जड कायम आहे.‌ याला कारण रस्ते आणि फुटपाथवर असणाऱ्या हातगाड्या, अवजड वाहने यासाठी शहरात वाहनतळे, रूंद रस्ते आणि हाॅकर्स झोन उभारणे गरजेचे आहे. मात्र या पायाभूत सुविधांसाठी महापालिका हालचाली करताना दिसत नाही.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'त्या' रस्त्याची दुरुस्ती कधी करणार?; कंत्राटदाराकडे एमएसआरडीसीचे अक्षम्य दुर्लक्ष

शहरातील विविध मध्यवर्ती ठिकाणी जसे की, गजानन महाराज मंदिरासमोरील रस्ता, बीड बायपास रोडवरील नव्या उड्डाणपुलाखाली, संग्रामनगर पुलाजवळ सिग्नलजवळ तसेच सिग्मा हॉस्पिटलजवळील रस्त्याच्या कडेला , चिकलठाणा आठवडी बाजार, त्रिमुर्ती चौक ते चेतकघोडा चौक व अन्य भागात भाजीवाले, फळवाले यांनी मोठ्या प्रमाणात रस्ते आणि फुटपाथवर‌ ताबा केला आहे.‌ त्यांच्याकडे फळे भाजीपाला घेणारे ग्राहक देखील भर रस्त्यांवर सर्रासपणे  चारचाकी, दुचाकी गाड्या रस्त्यावर लावतात. आधीच फळ भाजी विक्रेत्यांमुळे रस्ते अरूंद झालेली असताना हातगाड्यांपुढे लागलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.‌ यात रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना  धडका बसतात. अपघात होऊन वाहनचालक जखमी होतात. याची कुणाला काळजी का वाटत नाही, थेट रस्ते आणि फुटपाथचे सातबारे यांच्या नावाने केले आहेत का? महानगरपालिका यावर कारवाई का करत नाही, असे अनेक सवाल करत सातारा - देवळाईतील जनसेवा महिला समितीने महापालिका प्रशासनाला आव्हान केले आहे. यावर आता महापालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडे सार्यांचे लक्ष लागुन आहे. 

शहरात  वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांवर सातत्याने वाहनांची कोंडी सगळीकडे पाहायला मिळत आहे. त्यातच विविध ठिकाणी चालू असणारे सिमेंट रस्त्यांची , फुटपाथची कामे, छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकामे जोमाने सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ते अरूंद झाले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकर वाहतुक कोंडीने आधीच त्रस्त झाले आहेत. यावर शहर वाहतूक शाखेचे कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. नियंत्रण करणारे वाहतुक पोलिस केवळ सिग्नलजवळ एका हातात वाहनांचे फोटो काढण्यासाठी स्मार्टफोन आणि दुसऱ्या हातात पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी पेटीएम मशीन घेऊन उभे राहून कारवाई करताना दिसतात. मात्र ज्यांच्यामुळे वाहतुक कोंडी होते व रस्ते अरूंद होतात, अशा भाजी व फळविक्रेत्यांवर कारवाई करताना दिसत नाहीत, असा आरोप महिला सदस्यांनी केला आहे. 

Sambhajinagar
Sambhajinagar : रस्त्याच्या दुभाजकात नवीन खांब लावले पण जुने खांब हटणार कधी?

सद्य:स्थितीत शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम चालू असल्याने देवळाई चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता बंद केला आहे.‌ त्यामुळे बीड बायपासकडून  संग्रामनगर पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्याकडे २४ तास मोठी गर्दी उसळते. त्यात संग्रामनगर उड्डाणपुलासमोर‌ बीड बायपासवरच नेमक्या वळणावर भाजी व फळविक्रेत्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः हातगाड्यांसमोर ग्राहक बिनधास्तपणे बेशिस्त वाहने रस्त्यावर लावत असल्याने बायपासवर मोठी अडचण निर्माण झाली आहे.  वाहतुक शिस्तीचे नियमन करणारे पोलीस बघ्याची भुमिका घेतात. त्यामुळे एकीकडे स्मार्ट सिटीचा डंका पेटविला  जाणाऱ्या शहराचे हे चित्र कधी बदलणार?, असा सवाल करत महिला सदस्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. शहरात रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने सर्रासपणे उभी केली जातात. त्यामुळे इतर वाहनधारक व‌ पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून महानगरपालिका व शहर वाहतूक शाखेने संयुक्तपणे पथक स्थापण करून वाहने उचलण्याची मोहीम सुरू केली आहे.‌मागील १० महिन्यात त्यातून महानगरपालिकेला १२ लाखाचा महसूल मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र याचा छत्रपती संभाजीनगरकरांना काहीच फायदा होत नाहीऐ. कारण दंड वसुल करूनही बेशिस्त वाहनांची जड कायम आहे. सिडको - हडको या नवीन शहराला जोडणारे किराडपुरा व पोलिस मेस ते कटकटगेट या रस्त्यांच्या दोन्ही बाजुला भंगार वाहनांची थप्पी वर्षानुवर्षे कायम आहे. हीच परिस्थिती चंपाचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व चिश्तिया चौक ते जकात नाका, जकात नाका ते सेव्हन हील या प्रमुख मार्गावर दिसत आहे.‌

दंडात्मक कारवाई करूनही शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहन लावण्याची प्रथा कमी होत नाही. बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याठी शहर वाहतूक पोलिस शाखेमार्फत महापालिकेला पायाभुत सुविधांची मागणी करण्यात आली.‌ती मान्य करत महापालिकेने कर्मचारी व वाहने दिली.यासाठी महापालिकेने बेशिस्त वाहने उचलणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्रपणे टेंडर काढले. शहरातील ॲक्टीव्ह मोटर्सला काम देण्यात आले.‌ संबंधित कंत्राटदाराने शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकी वाहने उचलत गत १० महिन्यात २० हजार वाहने उचलन्याचा दावा केला जात आहे.‌प्रत्येक वाहनधारका कडून ५०० रुपये दंड वसूल केला जात आहे. त्यानंतर महापालिका २०० रुपये वसूल करते. मिळालेल्या दंडात्मक रकमेतून कंत्राटदाराला १५० रुपये व महापालिकेला ५० रूपये राॅयल्टी देण्यात येते.‌राॅयल्टीतून महानगरपालिकेला गत २० महिन्यात १२ लाखाचे उत्पन्न मिळाल्याचे अधिकारी सांगतात, पण याचा छत्रपती संभाजीनगरकरांना काहीच फायदा नाही. सिडको उड्डाणपूल - नाईक महाविद्यालय ते सिडको टी पाॅईंट लगत जालनारोडवर सायंकाळनंतर खाजगी प्रवासी वाहनांची गर्दी होत असल्याने जालनारोडवर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. एपीआय क्वार्नर ते प्रोझोन माॅल दरम्यान भारत बाजारसमोर सिमेंट रस्ता आणि फूटपाथवरच वाहने दुरूस्ती केली जात असल्याने सकाळ ते रात्री उशिरापर्यंत वाहनधारकांना जीव मुठीत धरून मोठी तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतो. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत तीन एकर जागेवर वाहनतळाचे काम कागदावरच असल्याने येथील प्रत्येक कंपनी समोरील रस्त्यांवर जड वाहने उभी केली जात असल्याने रस्ते अरूंद होत आहेत.‌ दुसरीकडे जुन्या व नव्या शहरात कामगार बसेस मुख्य रस्त्यांवरच मुक्कामी उभ्या केल्या जात आहेत. कंत्राटदाराकडून केवळ दुचाकी वाहने उचलण्यात धन्यता मानली जात आहे. परंतु रस्ते व फुटपाथ काबीज करणाऱ्यांकडे व मोठ्या वाहनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ही जड कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शहरात हाॅकर्स झोन, पुरेशी वाहनतळे, व ट्रक टर्मिनल पाॅईंटची निर्मिती करणे आणि रस्त्यांचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे.‌बहुतांश ठिकाणी अरूंद रस्ते आणि चौकांचा मोठा आकार असल्याने वाहने वळवायला मोठा त्रास होत असल्याचे दिसते. यावर देखील उपाय योजना आखणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com