Tendernama Impact : प्रशासनाची आता 'हाथ की सफाई'! लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली

Tendernama Impact : प्रशासनाची आता 'हाथ की सफाई'! लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली
Tendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट पसरलेले असताना मराठवाडा मुक्तीदिनाच्या अनुषंगाने व होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त शहरात येणाऱ्या व्हीआयपींना शहर स्वच्छ - सुंदर व आकर्षक दिसावे यासाठी जी - २० च्या काळात केलेली रंगरंगोटी व चित्रांवरील धूळ साफ करण्यासाठी महापालिकेच्या कारभाऱ्यांकडून होत असलेल्या लाखो लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी महापालिका प्रशासकांनी थांबवली आहे.

Tendernama Impact : प्रशासनाची आता 'हाथ की सफाई'! लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली
अजित पवार सुसाट; विकास प्रकल्प निधी वा प्रशासकीय मान्यतेअभावी रखडवू नका!

आता मजूर लावून कामाच्या ठिकाणी शंभर लिटर पाण्याचे ड्रम ठेऊन त्यात टॅकरद्वारे थोडेसे पाणी ओतून ओल्या फडक्याने रंगरंगोटी व चित्रे पुसली जात आहेत. थेट टॅंकरद्वारे पाईप लाऊन होत असलेली धुलाई महापालिका प्रशासकांनी थांबविली. पाण्याची नासाडी थांबल्याने पाण्याची बचत होऊन याचा फायदा नागरिकांना मिळाला आहे.

Tendernama Impact : प्रशासनाची आता 'हाथ की सफाई'! लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली
कृषिमंत्री होताच धनंजय मुंडेंची बीडसाठी मोठी घोषणा; 15 कोटी मंजूर

‘टेंडरनामा’ने यासंदर्भात सचित्र वृत्त प्रकाशित करताच शहरभर संतापाची लाट पसरली. एकीकडे शहरात पावसाळ्यात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे.

Tendernama Impact : प्रशासनाची आता 'हाथ की सफाई'! लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली
Nagpur : भ्रष्ट अधिकाऱ्यांना 'मनसे' देणार चोप; 'NIT'च्या विरोधात मोर्चा

जलसाठे आटत चालले आहेत आणि व्हीआयपींसाठी थेट रंगरंगोटीची पिण्याच्या पाण्याने धुलाई होत असल्याचा हा प्रकार 'टेंडरनामा'ने उजेडात आणताच शहरवासीयांनी महापालिकेतील बेजबाबदार कारभाऱ्यांबाबत खेद व्यक्त केला. त्याची महापालिका प्रशासकांनी दखल घेत घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांना समज दिली. संबंधित  विभागाने दखल घेत ठेकेदाराला सूचना केल्या व कामात ठेकेदाराने बदल केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com