Tender Scam : ...म्हणे 'या' कारणांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे फेरटेंडर!

PM Awas Yojana
PM Awas YojanaTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (PM Awas) टेंडरमध्ये घोटाळा (Tender Scam) झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

आता नव्याने करण्यात आलेल्या फेरटेंडर (Retender) प्रक्रियेत महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील कारभाऱ्यांनी खोटे कारण पुढे करत फेरटेंडर प्रक्रिया राबवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यात काय खोटे कारण दाखवले त्याचा सक्षम पुरावाच 'टेंडरनामा'च्या हाती' लागला आहे.

PM Awas Yojana
Nashik : महापालिकेचा सिंहस्थ पूर्व आराखडा बुधवारी होणार तयार

'ही' दाखवली खोटी कारणे

● फेरटेंडर प्रक्रिया राबवताना तयार केलेल्या टिप्पणीत सदर टेंडर प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या संदर्भात शासन निर्णय (गृहनिर्माण विभाग क्र.प्रआयो/ प्र.क्र./ १५३ / गृनिधो - २ दि. ५ डिसेंबर २०२२) अन्वये गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार मौजे चिकलठाणा गट क्र. ४७३ येथील ५.३२ हेक्टरवर २०० पक्क्या स्वरूपाच्या झोपड्या असल्याने व तेथे १.४ हेक्टरवर पाण्याचे तळे असल्याने या ठिकाणी गृहनिर्माण योजना राबविणे शक्य नाही.

● यासंदर्भात शासनाच्या गठीत समितीच्या अहवालानुसार आणि प्रत्यक्ष जागेवरील वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रथम टप्प्यात मौजे तीसगाव येथील गट क्रमांक २२५ / १, २२७ / १ मौजे पडेगाव येथील गट क्रमांक ६९ आणि मौजे सुंदरवाडी येथील गट क्रमांक ९ व १० मधील एकून २४.४९ हेक्टर आर क्षेत्रावर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत गृहप्रकल्प उभारण्यासाठी दिनांक १३ मार्च २०२३ रोजी नव्याने टेंडर प्रसिध्द करण्यात आले.

PM Awas Yojana
Mumbai : बेस्टकडून धक्कादायक निर्णय; पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली सेवा बंद

टेंडर पे फेरटेंडर

परंतु मौजे तिसगाव, सुंदरवाडी, पडेगाव याकरिता प्रत्येकी एक टेंडर प्राप्त झाले. मौजे तिसगाव गट क्रमांक २२७/१ करिता एकही टेंडर प्राप्त न झाल्यामुळे दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी दुसऱ्यांदा टेंडर प्रसिध्द करण्यात आले. त्याची टेंडर स्वीकृतीची अंतिम तारीख ३ मे २०२३ होती. परंतु दुसऱ्या वेळेस देखील तिसगाव गट क्र. २२५/१ सुंदरवाडी, पडेगाव याकरिता प्रत्येकी एकच टेंडर प्राप्त झाले. मौजे तिसगाव गट क्र.२२७/१ यासाठी एकही टेंडर प्राप्त झाले नाही.

हा केला उपाय

टेंडरला प्रतिसादच मिळत नसल्याने टेंडर समितीने नागरिकांची मागणी असे विशेष कारण पुढे करत तांत्रिक व आर्थिक क्षमतेत बदल न करता घरकुलासाठी पी + ४ ची अट शिथिल करून UDCPR नुसार बांधकाम योग्य क्षेत्रावर अनुज्ञेय बांधकाम करण्याचा बदल करून दिनांक ५ जून २०२३ रोजी टेंडर सूचनाद्वारे तिसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले.

यानंतर मौजे सुंदरवाडी गट क्र. ९ व १० मौजे तिसगाव गट क्र. २२५/१ या ठिकाणी प्रत्येकी दोन टेंडर प्राप्त झाले. मौजे पडेगाव गट क्र. ६९ व मौजे तिसगाव गट क्र. २२७ / १ या ठिकाणी एकच टेंडर प्राप्त झाले असून, तिसऱ्यांदा टेंडर कार्यवाहीत प्राप्त टेंडरचे प्रस्तावांचे तांत्रिक मुल्यमापण करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

टेंडरधारकांची प्रकल्प संकल्पना सादरीकरण दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी झाले आहे. टेंडरधारकांची आर्थिक बोली दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी उघडण्यात आली आहे. त्यांचे टेंडर देखील अंतिम करण्यात आले आहे. तसेच हर्सुल गट क्र. २१६ या गृहप्रकल्पाची दिनांक ३० जून २०२३ रोजीच्या टेंडर सूचनेद्वारे पहिल्यांदाच कार्यवाही सुरू आहे. याठिकाणी दोन टेंडर प्राप्त झाले असून टेंडर प्रस्तावाचे मुल्यमापन करण्यात आले आहे. टेंडरधारकाची आर्थिक बोली दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी उघडण्यात आली असून, टेंडर देखील अंतिम करण्यात आले आहे.

PM Awas Yojana
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

आता केवळ टेंडर समितीची बैठकीची प्रतिक्षा असून टेंडर प्रक्रियेअंती पात्र विकासकाची निवड करून या घटकाअंतर्गत पात्र अर्जदारांना योजनेचा लाभ देणेचे नियोजन सुरू असल्याचे विशेष सूत्राकडून कळाले. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी नव्याने दिनांक १९ डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत जुन्या तसेच नवीन अर्जदारांकडून अद्यायवत कागदपत्रांसह ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण ४२ हजार ३९६ अर्ज प्राप्त झाले असून, छाननीचे काम प्रगतीपथावर आहे. आजमितीस ४० हजार ३३ अर्ज पात्र असून ५१० अर्ज अपात्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .

येथे साकार होणार प्रकल्प हे आहेत ठेकेदार...

● मौजे सुंदरवाडी गट क्र. ०९ व १० येथे ५.३८ हेक्टर

- ऑर्थ्रोन कन्सट्रक्शन व जागृत सारा स्ट्रक्चर एल.एल.पी.

● मौजे तिसगाव गट क्रमांक २२५ / १ येथे  ५ . २९ हेक्टर तसेच गट क्र. २२७ /१ येथे १२.५५ हेक्टर

- सहकार जेव्ही व जागृत सारा कंन्सट्रक्शन
एलएलपी गट क्रमांक २२७ / १ एलोरा कंन्सट्रक्शन

● मौजे पडेगाव गट क्र. ६९ येथे १.२७ हेक्टर

- लक्ष्मी कंन्सट्रक्शन

● मौजे हर्सुल गट क्र. २१६ येथे ० . ८४ अशा एकुन २५. ३३ हेक्टर जागेवर हा प्रकल्प साकार केला जाणार असल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. 

- सारा बिल्डर्स ॲन्ड डेव्हलटर आणि के. एच कंन्सट्रक्शन

PM Awas Yojana
Pune : 'तो' पंचतारांकित पाहुणचार पुणे महापालिकेला पडला 30 लाखांना!

निवड समिती झोपली होती काय?

फेर टेंडरप्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या संदर्भात शासन निर्णय ( गृहनिर्माण विभाग क्र.प्रआयो/ प्र.क्र./ १५३ / गृनिधो - २ दि. ५ डिसेंबर २०२२) अन्वये गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार मौजे चिकलठाणा गट क्र. ४७३ येथील ५ . ३२ हेक्टरवर २०० पक्क्या स्वरूपाच्या झोपड्या असल्याने व तेथे १.४ हेक्टरवर पाण्याचे तळे असल्याने या ठिकाणी गृहनिर्माण योजना राबविणे शक्य नसल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.

मात्र यात एकही जागा गृहप्रकल्पासाठी योग्य नसताना टेंडर काढताना महापालिकेतील निवड समिती झोपली होती काय? विशेष म्हणजे प्रकल्प अयोग्य जागांवर विकास आराखडा संबंधित ठेकेदाराने केलाच कसा, तो कोणी अंतिम केला? याचा छडा लावणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com