Sambhajinagar : एकीकडे क्रीडा विद्यापीठ उभारणीच्या बाता अन् इकडे..

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : क्रीडा विद्यापीठासाठी जागेची निश्चित केली मंत्रालयात आता त्याच्या उभारणीच्या बाता सुरू आहेत. अर्थसंकल्पात त्यासाठी ५० कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली. मात्र, उभारणी लांबणीवर पडत असल्याचा फायदा घेत ओस पडलेल्या तब्बल १७० एकर जागेवरील जागोजागी लचके तोडून गौणखनिजाची चोरटी वाहतूक केली जात आहे. परिणामी क्रीडा विद्यापीठाच्या जागेवर मोठमोठी भगदाडं पाडली जात आहेत. भविष्यात क्रीडा विद्यापीठासाठी उभारणीचे  टेंडर काढल्यास या खड्ड्यात भरती करण्यासाठी कोट्यावधीची तरतूद कोणत्या बजेटमधून करणार, भरतीसाठी लागणाऱ्या गौणखनिजाची भर कोठून काढणार, असा प्रश्न 'टेडरनामा'च्या पाहणीत उपस्थित होत आहे. 

Sambhajinagar
Eknath Shinde: मुंबई पारबंदर प्रकल्प गेमचेंजर ठरेल;आर्थिक भरभराटही

करोडी येथील गट क्रमांक १३५ येथील सरकारी गायरान जमीनीपैकी १७० एकर जागा क्रीडा विद्यापीठासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, जिल्हा व महसूल विभाग व काही राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने क्रीडा विद्यापीठातील जागेवर मुरूम व माती माफीयांचा दिवसरात्र लचके तोडण्याचा खेळ सुरू आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योजक आणि करोडी ग्रामपंचायतीने तक्रार केल्यानंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने प्रत्यक्षात पाहणी केली असता प्रस्तावित क्रीडा विद्यापीठाच्या जमिनीतून अवैध मुरुम उत्खननाचा खेळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता तक्रार केल्यानंतर अप्पर तहसीलदारांचे आदेश तीन आठवड्याच्या कालावधीनंतर निघतात, त्याच्या आदेशानंतर एका आठवड्याच्या कालावधीनंतर मंडळ अधिकारी, तलाठी पंचनाम्यासाठी येतात. प्रत्यक्षात हद्दीच्या पोलिसात गुन्हे देखील दाखल करतात. मात्र न्यायालयात दंड भरून हे लोक पुन्हा उपसा सुरू करतात, असे या भागातील ग्रामस्थांनी कैफियत मांडली.छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करोडी येथील गट क्रमांक १३५ मधील सरकारी गायरान जमिनीपैकी ५५ हेक्टर ७९ आर ४६ हेक्टर ६० आर जमीन क्रीडा विद्यापीठाकरिता प्रदान करण्यात आलेली आहे. या जमीनीतून अवैध गौणखनिजाची चोरी होत मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : कारभाऱ्यांचा उलटा कारभार; उशिरा सुचलेले शहाणपण

२०१४-२०१९ या काळात माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र २०१९ मध्ये सरकार बदलताच महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यातील माजी अर्थ तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडाविद्यापीठ पुण्याला पळवत बालेवाडी येथे उभारले. पवारांच्या पळवापळवीवर येथील क्रीडाप्रेमींमध्ये मोठी टीकेची झोड उठली होती. त्यानंतर संभाजीनगरचे माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात विद्यापीठ उभारण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगत पवारांची पाठराखण केली. त्यानंतर दुसरे क्रीडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे उभारू असे आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पुर्ती करण्याआधीच महाविकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पाडले आणि राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारण्याची वचनपूर्ती देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात क्रीडा विद्यापीठाच्या विकासासाठी तब्बल ५० कोटी निधींची तरतूद देखील केली. त्यांच्या या निर्णयाने मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील क्रीडापटूंना दर्जेदार सरावासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे भव्य क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल. या विद्यापीठात क्रीडा विषयक शारिरीक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या संधी युवकांना मिळतील. 

Sambhajinagar
Nashik : जलजीवनमुळे रखडली सांडपाणी व्यवस्थापनची 55 कोटींची टेंडर

क्रीडा विद्यापीठ होईल तेव्हा होईल...

मात्र, क्रीडा विद्यापीठ होईल तेव्हा होईल, तुर्तास या शेकडो एकर जागेवर दिवस-रात्र जो मुरूममाफीयांची घुसखोरी सुरू आहे, अवैध उत्खननामुळे जमिनीवर मोठमोठी भगदाडं पाडली जात आहे. ती बुजविण्यासाठीच राज्य सरकारला कोट्यावधीचे टेंडर काढावे लागेल. परिणामी शेकडो ब्रास गौणखनिजासाठी आसपासचे डोंगर कापावे लागतील. परिणामी पर्यावरणाचा तर ऱ्हास होईलच शिवाय क्रीडा विद्यापीठाचे काम पुन्हा पुढे ढकलण्यात येईल. यासाठी तुर्तास निश्चित केलेल्या जागेवर चारही बाजुने सुरक्षाभिंत आणि सुरक्षारक्षकांची सोय करण्यात यावी.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com