Sambhajinagar : चारच दिवसांपुर्वी टाकलेली मलनिःसारण वाहिनी जलवाहिनीसाठी फोडली

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

Chhatrapati Sambhajinagar News : सिडको एन - 2 परिसरातील सोहम मोटर्स ते कासलीवाल मार्केट रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यासाठी कंत्राटदाराने नव्याने झालेली मलनिःसारण वाहिनी फोडली असून, अप्रोच रस्ते फोडून पार वाटोळे केले आहे. फोडलेले रस्ते बुजवण्यासाठी त्यावर केवळ उकरलेली माती टाकून फोडलेले रस्ते बुजवण्यात येत आहे. नव्याकोरा रस्ता मातीत घातल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी महानगरपालिकेला तातडीने कंत्राटदार शोधून काम उरकावे लागत आहे. एकूण जीव्हीपीआरच्या नियोजनशून्य कारभारामुळे महानगरपालिका टेंडर पे टेंडर काढत असून कंत्राटदार आणि कारभाऱ्यांची 'दिवाळी' होत आहे तर मात्र करदात्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : सिडकोला अंधारात ठेऊन विनाटेंडर केला झालर क्षेत्राचा आराखडा

सिडको - एन 2 परिसरात सोहम मोटर्स ते कासलीवाल मार्केट दरम्यान ७०० एमएमची जलवाहिनी जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने सहा महिन्यांपूर्वी फोडून कनेक्शनच बंद केले होते. दरम्यान महानगरपालिकेच्या झोन क्रमांक पाचच्या वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी तातडीने दखल घेत मलनिःसारण वाहिनी महानगरपालिकेच्या वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत शीर्षकातून बदलली यासाठी जवळपास २५ हजार रुपये खर्च केले. त्यानंतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराचे वरातीमागून घोडे आले. सिडको एन - 2 परिसरातील एचपीसीएल क्वार्टर ते जालनारोड ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दरम्यान घरगुती नळकनेक्शनसाठी पाणी पुरवठा करणारी २५० एम.एम.च्या जलवाहिनीचे काम हाती घेतले.

दरम्यान बुधवारी कंत्राटदार कंपनीने जलवाहिनी टाकताना मलनिःसारण वाहिनीचे पार वाटोळे केले. त्यानंतर महानगरपालिकेने तातडीने सोहम मोटर्स ते कासलीवाल गार्डन ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंतचे काम शीतल पहाडे यांच्या बालाजी कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू केले.

Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : सातारा खंडोबा मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यांचा कोणी केला खेळखंडोबा?

दरम्यान नादुरूस्त मलनिःसारण बदलण्याआधी महानगरपालिका व जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीचा असमन्वय आहे. विशेषतः मलनिःसारण वाहिनीच्या शेजारी जलवाहिनी नसावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे आदेश असताना काम केले जात आहे.

मलनिःसारण वाहिनीलगतच जलवाहिनी टाकण्यात येत असल्यामुळे नागरिकांकडून ओरड करण्यात येत आहे. दरम्यान जलवाहिनीसाठी फोडण्यात आलेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चांगल्या रस्त्याची जलवाहिनीसाठी वाट लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com