Sambhajinagar : लोकसभेच्या रणधुमाळीत आश्वासनांचा पाऊस पण सातारा-देवळाईत पाणीटंचाईने होरपळले लोक

Water Tanker
Water TankerTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा-देवळाई परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या सातारा व देवळाईतील गावठाणांना दरदिवशी महापालिकेमार्फत दोन्ही गावातील आठ हजार नागरिकांसाठी २४ हजार लिटर टॅंकरद्वारे दिवसातून चार वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. देवळाई गावासाठी जुन्या ग्रामपंचायत काळातील सोलापूर हायवे बाळापूर हद्दीतील बावडीत पाणी टाकुन देवळाई गावातील पाण्याच्या टाकीत चढवले जाते व नंतर ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या पाइपलाइनद्वारे पाणी देवळाई गावठाणात घराघरात पोहोचवले जाते. त्याच प्रमाणे साताऱ्यात देखील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळातील विहिरीत जलसाठा करून पाणी ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या पाइपलाइन द्वारे घराघरात पोहोचवले जाते.

Water Tanker
Sambhajinagar : नियमांवर पांघरूण घालून कंत्राटदाराचे खोदकाम सुरूच; पाणीपुरवठा योजनेने...

मात्र, या दोन्ही गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जुनाट झाल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील जलकुंभावरून या दोन्ही गावातील साठवन टाक्यात टॅंकर जाईपर्यंत रस्त्यांची खड्डेमय अवस्था असल्याने निम्म्या पाण्याची गळती झालेली असते. विशेष म्हणजे सातारा-देवळाईत वीजेचा लपंडाव पाचवीलाच पुजल्याने वीजेअभावी गावठाणात पाणी पुरवठा करण्यास व्यत्यय येत असल्याने गावठाणातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे महापालिका ५० ते ५५ गृपला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करते. यासाठी एका व्यक्तिकडून महिन्याला ३६६ रूपये आकारते बदल्यात दोनशे लिटरचा एक दिवसाआड एक ड्रम पाणी देते. मात्र ज्याठिकाणी २५ ते ३० लोकांचा गृप असेल आणि पक्के रस्ते असतील, अशाच ठिकाणी महापालिका पाणीपुरवठा करते. त्यात गावठाणा व्यतिरिक्त कुठेही  तत्कालीन ग्रामपंचायत आणि महापालिकेने हरघर जलयोजना साकार न केल्याने या भागातील दिड लाख लोकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाच हजार लिटरच्या टॅंकरसाठी सातशे ते आठशे रूपये मोजावे लागत आहेत. तर एक हजार लिटरच्या टॅंकरसाठी दोनशे ते अडीचशे रूपये मोजावे लागत आहेत. धक्कादायक म्हणजे सातारा-देवळाई भागातील पाझर तलाव, विहिरी आणि बोअरवेल आटल्याने पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. या भागातील खाजगी टॅंकरधारकांना पाण्यासाठी आगाऊ पैसै देऊनही दोन दोन दिवस पाण्यासाठी वाट पाहाण्याची वेळ आली आहे. सातारा तांडा ते झाल्टा फाटालगत दुर वरून टॅंकरचालकाना पाणी वाहून आणावे लागत आहे.

Water Tanker
Sambhajinagar : निजाम काळातील तलावांना बांधकामाचा विळखा; चूक कोणाची? जबाबदार कोण?

ग्रामपंचायतीच्या काळात गांधेली येथील विहिरीतून देवळाईत पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र सातारा-देवळाईचे महापालिकेत हस्तांतरण होताच महापालिकेने त्या विहिरीचा गाळ काढुन खोलीकरण, रूंदीकरण न करता याउलट विहिरीचा वापर बंद केला. २०१५ मध्ये महानगरपालिकेत समावेश झालेल्या सातारा-देवळाई गावठाणातील जुनाट पीव्हीसी पाइपलाइनच्या नळकांड्या देखील बदलण्याची तसदी घेतली नाही. याभागात उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता तलावांची साठवन क्षमता वाढविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना आखल्या नाहीत.तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात जिल्हाधिकारी खाजगी विहिरी ताब्यात घेऊन नागरिकांना पाठीपुरवठा करत असे, याशिवाय जिल्हा परिषदेमार्फत दहा हजार लिटरचे टॅकरमार्फत दररोज वीस ते २५ फेर्या करून मोफत पाणी द्यायचे मात्र, महापालिकेला लोक पैसै देऊन विकतचे पाणी घ्यायला तयार असताना महापालिका पाणी देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सातारा-देवळाई- बीड बायपास भागात भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश करण्यापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना सातारा - देवळाईतून करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र या भागात देवळाई म्हाडा काॅलनी व धुळे-सोलापूर हायवेलगत विठ्ठलनगर ख्वाजा टेकडी येथील जलकुंभाचे दहा टक्के देखील काम झाले नाही. अंतर्गत व मुख्य जलवाहिनींचे चाळीस टक्केही काम झाले नाही. त्यामुळे सातारा-देवळाईकरांना नवीन पाणीपुरवठा योजना कधी पाणी पाजणार हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे सातारा-देवळाई व बीड बायपास भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असताना भावी आणि माजी उमेदवार मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीच्या काळात नव्या योजनांचा आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com