Sambhajinagar : सातारा-देवळाईकरांसाठीच्या 'त्या' 500 कोटींच्या प्रकल्पाचे काय झाले?

water shortage (Pani)
water shortage (Pani)Tendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराची तहान भागविण्यासाठी एकमेव जायकवाडी प्रकल्पावर छत्रपती संभाजीनगरकरांना अवलंबून राहावे लागते. या प्रकल्पातून आज शहरासाठी किमान ३५० एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ १२० ते १२५ एमएलडी पाणी मिळते. यासाठी २२ ऑक्टोबर २०१८ मध्ये महापालिका प्रशासनाने शहर परिसरातील चारही दिशांना असलेल्या डोंगररांगांच्या नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.‌ तत्कालीन महापालिका आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. विनायक निपुण यांच्या पुढाकारानंतर जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यात त्यांनी शहराच्या गरजेपेक्षा तिप्पट पाणी तेही कमी विजेचा वापर करून मिळू शकते, असा दावा केला होता. पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीतून सातारा-देवळाईत पायलट प्रोजेक्‍ट सुरू करण्याचा निर्णय निपुण यांनी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहिर केला होता. मात्र पुढे काही झाले नाही.‌ एकुणच सातारा - देवळाईकरांची निपुण यांनी फसवणुकंच केली. त्यामुळे ५०० कोटीच्या या प्रकल्पाचे गाजर दाखविण्यामागे अर्थातच प्रसिध्दीसाठीच तोंडाच्या वाफा सोडल्याचे स्पष्ट होते.

water shortage (Pani)
Mumbai : नालेसफाईतील निष्काळजीपणा भोवला; ठेकेदारांना 31 लाखांचा दंड

राज्यात सर्वाधिक महाग पाणी छत्रपती संभाजीनगरकरांना मिळते. कारण छत्रपती संभाजीनगर शहराला ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पैठण येथील जायकवाडी धरणातून महानगरपालिका पाणी आणते. त्यासाठी अनेक ठिकाणी विद्युत मोटारी लावून पाणी लिफ्ट करावे लागते. त्यासाठी वर्षाला ५० ते ५५  कोटी रुपयांचा वीज बिलाचा बोजा उचलावा लागतो. इतक्या मोठ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी तत्कालिन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. विनायक निपुण यांनी या महागड्या पाण्याऐवजी छत्रपती संभाजीनगर शहर‌ परिसरातील‌ सातारा - देवळाई, जटवाडा, भावसिंगपुरा - गांधेली, पहाडसिंगपुरा, सोनेरीमहल व विद्यापीठ परिसर हर्सुल परिसरातील डोंगररांगातुन उतरणारे पावसाचे पाणी अडवून बंधारे, खोलीकरण करण डोंगर पायथ्याशी तलाव बांधण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शहराला पाणी कसे मिळू शकेल, यासाठी निपुण यांनी शहरातील अनेक जलतज्ज्ञांसोबत अनंत बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर काही जलतज्ज्ञांनी निपुण यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शहरातील चारही भागातील डोंगरांचा अभ्यास करत अहवाल सादर केला ; मात्र ५०० कोटींचा हा प्रकल्प कागदावरच राहिला. शिरपुर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर, प्रमोद खैरनार, संजय कापसे, डॉ. अशोक तेजनकर यांनी नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास केला होता. त्यांनी २९ ऑक्टोबर २०१८ रोजी निपुण यांना अहवाल सादर केला जाणार होता. त्यात हर्सूल, सावंगी, सातारा - देवळाई, कांचनवाडी, नक्षत्रवाडी व चिकलठाणा या भागातून शहराला ३१० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते. संपूर्ण कामासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्‍यता अहवालात नमुद करण्यात आली होती.  यातील सातारा-देवळाईसारख्या भागात स्मार्ट सिटीच्या निधीतून पायलट प्रकल्प उभारण्यासाठी निपुण यांच्यासोबत जलतज्ज्ञांची चर्चाही झाली होती.

water shortage (Pani)
Nashik : नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ; वाहतूक शाखेला मिळेना ठेकेदार

तज्ज्ञांच्या मते शहराचा परिसर ६४२ चौरस किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे. दरवर्षी ६७२ मिलिमीटर सरासरी एवढा पाऊस होतो. यापैकी बाष्पीभवन व इतर कारणांमुळे उपलब्ध न होणारे पाणी वगळले तरी ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. शहर परिसरातील डोंगराळ भागातील पाणी देवगिरी , खाम आण सुखना नदीद्वारे व शहरातील नाल्यातून वाहून जाते. हे पाणी अडविले आणि मुरविल्यास शहराला कमी वीज वापरून पाणी उपलब्ध होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.‌ सातारा-देवळाई - गांधेली परिसरात २० लहान-मोठे तलाव आहेत. हे तलाव दोन-तीन पावसांतच भरतात व पाणी वाहून जाते. त्यामुळे तलाव खोल केल्यास ४५ किलोमीटरच्या या पाणलोट क्षेत्रात ११.७ दलघमी पाणी वाढू शकते. या भागात उपलब्ध ३२ दशलक्ष लिटर पाण्यावर सव्वा लाख नागरिकांची तहान भागेल, असे अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र पुढे या प्रकल्पाचे काही झाले नाही.‌

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com