Sambhajinagar : विकास योजनेतील 30 मीटर रस्ता कधी होणार पूर्ण?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका अतिक्रमण हटाव विभाग आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ आणि व्हीआयपी रस्त्याला मिळणाऱ्या ३० मीटर रुंदीचा विकास योजनेतील अद्याप अतिक्रमणांनी बाधित आहे. ही अतिक्रमण कधी पाडणार, येथील बेघर गरजूंना कुठे घरे उपलब्ध करून देणार आणि हा अर्धवट रस्ता कधी पूर्ण करणार, असा सवाल "टेंडरनामा"च्या पाहणीत नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : ग्रीन वेस्ट प्रकल्पाची आवश्यकता; उघड्यावर जाळला जातोय कचरा

शहरातील ऐतिहासिक नौबत दरवाजातून हा रस्ता पंचकुवा कब्रस्थान, कोहीनुर प्लाझा, रोहिलागड गल्ली, रंगार गल्ली, सिटी चौक, टिळकपथ, औरंगपुराकडून थेट व्हीआयपी रोडला मिळतो. मात्र पंचकुवा कब्रस्तान ते नौबत दरवाजापर्यंत ४०० मीटर अंतराचे काम गत वर्षभरापासून रखडलेले आहे. यामुळे कब्रस्तान समितीचे सर्व पदाधिकारी यांनी या रखडलेल्या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.‌ पंचकुवा ब्रीजपासून नौबत दरवाजा पर्यंत रस्त्याच्या एका बाजूला काही घरांचे अतिक्रमण आहे. अद्याप ते काढण्यात आले नाही. विकास योजनेतील ३० मीटर रस्त्यावर अतिक्रमण असल्याने एका बाजूचा रस्ता अजून थंड बस्त्यात आहे. किलेअर्क आणि पंचकुआ कब्रस्तान परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण मोहिम येताच आम्हाला पर्यायी घरे उपलब्ध करून द्या म्हणत काही लोक जेसीबीच्या पुढे उभे टाकत असल्याने मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र महानगरपालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन हवेत विरल्याने आता नागरिक रस्ता सोडायला तयार नाहीत.

Sambhajinagar
Mumbai : हार्बर रेल्वेचा 'या' स्टेशनपर्यंत होणार विस्तार; पुढील महिन्यात 825 कोटींचे टेंडर

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले नौबत दरवाजा ते कोहीनूर प्लाझा लगत पंचकुआ कब्रस्तान पुलापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे एका बाजूने काम आटोपून कंत्राटदाराने पळ काढला आहे. मात्र दुसर्या बाजूने रखडलेले आहे. त्या बाजूने कामासाठी खोदून ठेवलेला रस्ता आणि नौबत दरवाजाच्या दिशेने मोठा मातीचा उतार आणि पंचकुआ कब्रस्तानपुढे नाल्यावरील चढ, त्यात डाबके साचल्याने या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यातील अतिक्रमण बांधकामांचे मोजमाप आणि हद्द - खुणा निश्चित करण्याची जबाबदारी नगर रचना विभागाची आहे. मात्र त्यांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला आहे. इकडे जोपर्यंत मोजमाप करून हद्द - खुणा निश्चित होत नाही, आम्ही अतिक्रमण कसे पाडणार म्हणत अतिक्रमण हटाव पथक मुग गिळुन गप्प बसला आहे. रस्त्याच्या कामाचा वेग वाढवण्या- साठी महानगर- पालिकेतील  बांधकाम विभागप्रयत्न करताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एका बाजूने रस्त्याचे काम आटोपून कंत्राटदाराने पळ काढला त्यानंतर महापालिकेचे अधिकारी फिरकले नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.

Sambhajinagar
Mumbai : दहिसरच्या 'त्या' स्कायवॉकची पुनर्बांधणी कधी? ठेकेदाराकडून 30 कोटीत जुजबी मलमपट्टी सुरु

या रस्त्यासाठी तीन कोटींचे टेंडर महापालिकेच्या वतीने काढण्यात आले होते. मकरूम सिद्दीकी या कंत्राटदारामार्फत काम सुरु करण्यात आले आहे. सध्या किलेअर्क परिसरातील व्हीआयपी रस्ता ते नौबत दरवाजा ते पंचकुआ कब्रस्तान पुलापर्यंत मुख्य रस्त्याचे एका बाजूने काम पुर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बाजूने खोदून केवळ खडीकरण व मजबुतीकरणाचे काम अर्धवट ठेवत कंत्राटदारामार्फत यंत्रणा ठप्प करण्यात आली आहे. नौबत दरवाजाच्या दुसऱ्या बाजूने जोड रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने अद्याप अतिक्रमण काढुन कंत्राटदाराला रस्ता मोकळा करुन दिला नाही. त्यामुळे या अरुंद व अर्धवट रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्ता खोदलेल्या ठिकाणी केवळ खडी मुरुम करून रोलरने दबाई करून दिलेला आहे. परिणामी अवकाळी पावसाने त्याचा चिखलदरा झाल्याने या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रवासी घसरून पडत आहेत.दररोज अशा दहा ते पंधरा घटना घडत असल्याचे नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी  मागणी या भागातील नागरिक करत आहेत. किलेअर्क परिसरातील व्हीआयपी रस्ता ते नौबत दरवाजा ते पंचकुआ कब्रस्तानकडून हा रस्ता रोहीलागंल्ली, सिटीचौक, बुढीलाईन, लोटाकारंजा, पैठणगेट, गुलमंडी, सब्जीमंडी, कासारीबाजार, दिवानदेवडी, रंगारगल्ली, खोकडपुरा व औरंगपुरासह महत्वाच्या बाजारपेठेत जात असल्याने सिडको- हडकोसह नागरिकांसाठी महत्वाचा रस्ता आहे. ऐन सणासुदीच्या काळात रसत्याचे काम रखडले आहे. अधिकारी आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहतूककोंडी आणि अपघाताची संख्या वाढत असल्याने  नागरिकांचा पारा वाढलेला आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com