सिडकोतील 'या' क्रीडा संकुलाचा कोणी केला खेळखंडोबा?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको, हडकोतील  नागरिकांसाठी आरक्षित असलेल्या राजीव गांधी क्रीडासंकुलाचा खेळखंडोबा झाला आहे. क्रीडा संकुलातील मैदानात क्रीडा स्पर्धा, सामने सोडून भलतेच खेळ रंगत आहेत. दिवसा ‘खासगी ट्रॅव्हल्स’च्या बसचे पार्किंग, भिंत फोडून मैदानातून शॉर्टकट, सार्वजनिक स्वच्छतागृहासारखा क्रीडांगणाच्या भिंतींचा उपयोग आणि रात्री मद्यपान, जुगार यासाठीच हे स्टेडियम चर्चेत आहे. काही वर्पांपूर्वी येथील क्रीडासंकूलाचा विकास करण्याची सिडको-हडको व्यापारी संघटनेने  तयारी दर्शवली होती. मात्र महापालिका कारभाऱ्यांनी त्या प्रस्तावाकडे पाहिलेही नाही. एवढेच नव्हे, तर क्रीडासंकूलातील भव्य मैदानासाठी महापालिकेने जबाबदारी देखील स्वीकारण्याची तयारी दाखवली नाही. आता महापालिका प्रशासकांनी आम्हाला खेळू द्या या उपक्रमात मैदानाचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar:रेल्वे स्थानकातील अडीच कोटीचा पादचारी पूल बनला शोपीस

तत्कालीन सिडको प्रशासनाने गुलमोहर काॅलनीलगत एन-५ च्या मुख्य रस्त्याच्या दर्शनीभागात व्यापारी संकुल आणि पाठीमागे भव्य क्रीडासंकूल अशी निर्मिती ३२ वर्षांपूर्वी केली होती. सिडको-हडको भागातील नागरिकांना क्रीडांगण मिळावे म्हणून राजीव गांधी स्टेडियम तयार करण्यात आले. प्रारंभीचा काही काळ वगळता या भरवस्तीतील मैदानाचा गैरवापरच मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला. आजपर्यंत येथे कुठलीही मोठी स्पर्धा भरवली गेली नाही. इतरच कारणांसाठी या मैदानाचा वापर होत असतो. गणेशोत्सवात मंडळाचा मंडप, नवरात्रात दांडिया, दिवाळी आधी फटाका मार्केट असा या मैदानाचा नियमित वापर असतो, पण उर्वरित काळात मात्र इतर भलतेच खेळ होत असतात.

Sambhajinagar
नवी मुंबई मेट्रोला CMRSचा ग्रीन सिग्नल; बेलापूर-पेंधर मेट्रो आता..

खासगी पार्किंग

या मैदानावर काही खाजगी कंपनीच्या बसचे पार्किंग स्टँड बनले आहे. चार ते पाच बसेस तेथे रोज उभ्या असतात. तेथेच या बसेसच्या दुरुस्ती देखभालीचे काम होत असते. मैदानाचा एक मोठा कोपरा त्यांनी व्यापून टाकला आहे. शिवाय या मैदानाच्या भिंतींचा चक्क सार्वजनिक स्वच्छतागृहांसारखा वापर सतत सुरू असतो. परिणामी येथे कायम दुर्गंधीचे साम्राज्य असते. चिश्तीया कॉलनी ते बळीराम पाटील शाळेपर्यंतच्या रस्त्यावर कोठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने या आडोशाचा सर्रास वापर होत आहे.

चक्क शॉर्टकट

स्टेडियमची संरक्षक भिंत पाडून तेथून रस्ताच करण्यात आला आहे. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दुचाक्या, रिक्षा, कार मैदान ओलांडत थेट पलीकडच्या वसाहतीत ये जा करीत असतात. स्टेडियमच्या बाजूने असलेला रस्ता टाळून चक्क शॉर्टकट म्हणूनच मैदानाचा वापर सुरू झाला आहे.

Sambhajinagar
Nashik : सिडको उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर आकारणार रोज 1 लाखाचा दंड

संध्याकाळी मद्यपी
दिवसभर पार्किंग, स्वच्छतागृह, शॉर्टकट असा वापर होणार्‍या या मैदानाचे रात्री बारमध्ये रूपांतर होत असते. स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीवर मद्यपींचा हा बार सुरू असतो. जवळच्या वाइन शॉप्समधून बाटल्या आणून येथे रात्री उशिरापर्यंत मद्यपान करीत बसणार्‍यांची टोळकी पाहायला मिळतात. प्रेक्षक गॅलरीत बाटल्यांचे ढिगारे, फोडलेल्या बाटल्यांच्या काचा पाहायला मिळतात. या शिवाय भरवस्तीत एकांत देणारी जागा असल्याने दिवसा आणि रात्रीदेखील मैदानाच्या कोपर्‍यात जुगार्‍यांचे अड्डे बसलेले असतात.

नागरिकांना त्रास

सिडकोतील गुलमोहर काॅलनीत राहणार्‍या नागरिकांना सर्वाधिक त्रास होतो. हिरवळीचा पत्ता नसणार्‍या या मैदानावर दिवसा इतर भागातील मुले, तरुण क्रिकेट खेळतात. मैदानाच्या मध्यभागातून शॉर्टकट असल्याने एका कोपर्‍यात त्यांचे सामने रंगतात. मात्र, त्यावरून शेजारी राहणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. चेंडू आवारात येणे, नागरिकांना लागणे, त्यानंतर भांडणे असे प्रकार नेहमीच सुरू असतात. नागरिकांनी तक्रारी करूनही हा त्रास थांबलेला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com